रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी VVIP पाहुण्यांना निमंत्रण, अमिताभ, सचिन, विराट, अंबानी आणि... पाहा Guest List
Ram Mandir Inauguration : अयोध्येत उभं राहत असलेल्या भव्य राममंदिराच्या उद्घाटनासाठी व्हीव्हीआयपी पाहुण्यांची यादी तयार करण्यात आली आहे. जवळपास 3000 पाहुण्यांना निमंत्रण पाठवण्यात आलं असून यात कलाकार, उद्योगपती, खेळाडू, साधूसंतांचा समावेश आहे.
Ayodhya Ram Mandir Consecration Ceremony: उत्तर प्रदेशच्या अयोध्येत उभं राहणाऱ्या राममंदिरातील (Ram Mandir Temple) रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठा सोहळा नव्या वर्षात म्हणजे 22 जानेवारीला आयोजित करण्यात आला आहे. यासाठी देशभरातील नामवंत पाहुण्यांना आमंत्रण (VVIP Guest List) पाठवण्यात आलं आहे. देशातील आणि जगभरातील एकूण 7 हजार पाहुण्यांना निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. यात तीन हजार VVIPचां समावेश आहे. या सोहळ्याचं सर्वात पहिलं निमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना देण्यात आलं. याशिवाय भाजपाच्या दिग्गज नेत्यांचाही समावेश आहे. यात लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि उमा भारती या ज्येष्ठ नेत्यांचा समावेश आहे.
कलाकार, उद्योगपतींना निमंत्रण
याशिवाय कलाकार, उद्योगपती, खेळाडू, साधूसंत अशा विविध क्षेत्रातील दिग्गजांनाही सोहळ्यासाठी हजर राहण्याची विनंती करण्यात आली आहे. यात महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), अक्षय कुमार, ज्येष्ठ गायिका आशा भोसले, उद्योगपती रतन टाटा, मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांना निमंत्रण देण्या आलं आहे. क्रिकेटर्समध्ये भारतरत्न सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि स्टार फलंदाज विराट कोहलीला (Virat Kohli) सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे.
3000 हजार VVIP पाहुण्यांचा समावेश
सू्त्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोहळ्यासाठी 3000 हजार व्हीव्हीआयपी पाहुण्यांची यादी तयार करण्यात आली असून सर्वंना निमंत्रण पत्रिका पाठवण्यात आली आहे. विशेष म्हणजे छोट्या पडद्यावर लोकप्रिय झालेल्या रामायण या मालिकेतील कलाकारांनाही बोलावण्यात आलं आहे. श्रीरामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल, सीतेची भूमिका साकारणारी दीपिक चिखलिया यांचा समावेश आहे. याशिवाय काही वरिष्ठ पत्रकारांनाही निमंत्रण देण्यात आलं आहे.
रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण पोस्टाने पाठवलं जाणार आहे. अनेक मोठे साधुसंत, शंकराचार्य धार्मिक नेते, शासकीय अधिकारी, निवृत्त सैनिक, वरिष्ठ वकील, वैद्यानिक, कवी, संगीतकार आणि पद्म पुरस्कार विजेत्यांनाही निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या 50 कारसेवकांच्या कुटुंबियांनाही या सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याची विनंती करण्यात आली आहे. सोहळ्यात उपस्थित राहणाऱ्या सर्व पाहुण्यांची जेवण आणि इतर व्यवस्था करण्यात आली आहे.
कंगनाला निमंत्रण नाही
अभिनेत्री कंगमा रानौतला या सोहळ्याचं निमंत्रण नसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. गेल्याच महिन्यात कंगणा रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येत होती. यावेळी तीने अयोध्येतील आंदोलनात प्राण गमावलेल्या कारसेवकांची आठवण काढली. राममंदिर बांधणाऱ्या कारागिरांशीही तीने संवाद साधला.