एखाद्या दुकानदाराने मुलांना केक फुकट खाऊ घातला तर त्यांच्यासाठी यापेक्षा मोठा आनंद काय असू शकतो. अशाच एका ऑफरचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये केकच्या दुकानाचा एक फोटो आहे, ज्यावर अनाथ लहान मुलांसाठी मोफत केक देण्याची ऑफर देण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी हा फोटो ट्विट केला आहे. या फोटोमध्ये फ्री फ्री फ्री, ज्या मुलांना आई किंवा वडील नाहीत अशा ०-१४ वर्षाच्या वयोगटातील लहानग्यांना मोफत केक दिला जाणार आहे.


आयएएस शरण यांनीही या दुकानदाराचे कौतुक केले आहे. मी दुकानाच्या मालकाबद्दल माझे प्रेम आणि आदर व्यक्त करतो, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. एका ट्विटला उत्तर देताना त्यांनी हा फोटो उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील असल्याचे सांगितले. 


दुकानदाराचा हा स्वभाव सोशल मीडिया युजर्सनाही आवडला आहे. लोकांनीही या उदात्त हेतूसाठी दुकान मालकाचे आभार मानले आहेत.



आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी ट्विट केलेला हा फोटो 2 हजारांहून अधिक वेळा रिट्विट करण्यात आला आहे. तसेच 27 हजारांहून अधिक लोकांनी त्याला लाईक केले आहे. याशिवाय यावर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. अमित मिश्रा नावाच्या युजरने म्हटले आहे की, मला त्या दुकानदाराशी ओळख करून द्या. या मानवतावादी कार्यात मला त्यांना मदत करायची आहे.