लखनऊ : उत्तर प्रदेशमध्ये महानगर पालिका निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारत सत्ता काबीज करण्याकडे कूच केलेय. तर समाजवादी पार्टीला जोरदार धक्का बसलाय. भाजप आणि बसपामध्ये टक्कर पाहायला मिळत आहे. १६ पैकी १४ महापालिकांत बाजने आघाडी घेतल्याचे चित्र दिसून येत आहे.


योगी आदित्यनाथांची परीक्षा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर त्यांची पहिलीच परीक्षा असल्याचे म्हटले जात आहे. या परीक्षेत ते उत्तीर्ण झाल्याची चर्चा आहे. उत्तर प्रदेशमध्ये आज १६ महानगरपालिका, १९८ नगरपालिका आणि ४३८ नगरपंचायतीचा निकाल जाहीर होत आहे. 


बसपाचे पुनरागमन, सपाला फटका


या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत महापौरांच्या १६ जागांचे कौल हाती आले असून भाजपाने एका जागेवर विजय मिळवला असून १० ठिकाणी आघाडीवर आहे. मायावतींच्या बसपानेही पुनरागमन केले आहे. बसपा ५ ठिकाणी आघाडीवर आहे. 


कौल कोणाला मिळतो याची उत्सुकता


फेब्रुवारी महिन्यात जाहीर झालेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाने चांगले यश मिळवले होते. भारतीय जनता पक्षाने तब्बल ३१२ जागा जिंकून उत्तर प्रदेशात एकहाती सत्ता प्राप्त केली आहे. त्यामुळे आता उत्तर प्रदेशात पालिका निवडणुकीत काय कौल मिळतो, याकडे लक्ष लागले आहे.


दरम्यान, गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील पालिका निवडणूक महत्वाचे मानले जात आहे. या निवडणुकीकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष आहे.