मुंबई : मुंबईतल्या गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी आज उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबईत आले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एस्सेल उद्योगसमूहाचे चेअरमन डॉक्टर सुभाष चंद्रा, रिलायन्स उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्यासह प्रमुख उद्योगपतींची त्यांनी यावेळी भेट घेतली. 


२०१८ साली उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक व्हावी, या उद्देशाने योगी आदित्यनाथ यांचे प्रयत्न सुरु आहेत.


त्यादृष्टीनं २१ आणि २२ फेब्रुवारीला लखनौमध्ये उद्योजक संमेलन आयोजित करण्यात आलंय. या सोहळ्याचं निमंत्रण देण्यासाठी योगी आदित्यनाथ यांनी मुंबईतल्या मोठ्या उद्योगपतींची भेट घेतली.