मृत व्यक्तीकडून १९ वर्षीय मुलीवर बलात्कार? पोलिसांकडून FIR दाखल
UP Crime: उत्तर प्रदेशमधून दररोज खून, दरोडा, बलात्काराच्या अनेक घटना समोर येत असतात. येथील पोलिसांनी गुन्हेगारावर जरब बसविणे अत्यावश्यक आहे. दरम्यान आणखी एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशच्या मेरठ येथून समोर येत आहे. येथे १९ वर्षीय युवतीवर बलात्कार झाल्याचे वृत्त उघडकीस आले आहे.
UP Crime : उत्तर प्रदेशमधून दररोज खून, दरोडा, बलात्काराच्या अनेक घटना समोर येत असतात. येथील पोलिसांनी गुन्हेगारावर जरब बसविणे अत्यावश्यक आहे. दरम्यान आणखी एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशच्या मेरठ येथून समोर येत आहे. येथे १९ वर्षीय युवतीवर बलात्कार झाल्याचे वृत्त उघडकीस आले आहे. याहून धक्कादायक म्हणजे पोलिसांनी २३ वर्षाच्या आरोपीसोबत २० वर्षापूर्वी मृत्त पावलेल्या त्याच्या पंजोबांविरोधातही एफआयआर दाखल केली आहे. त्यामुळे घटना नेमकी कशी घडली? नेमके गुन्हेगार नेमके कोण आहेत? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
मेरठमधून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. येथे 19 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी 23 वर्षीय आरोपी विरोधात गुन्हा दाखल केलाच. पण यासोबतच त्याचे 90 वर्षीय आजोबा आणि कुटुंबातील 4 पिढ्यांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे आरोपीचे पंजोबा 20 वर्षांपूर्वी मरण पावले आहेत. लग्नाच्या बहाण्याने आरोपी तरुणाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. ही बाब त्याने घरच्यांना सांगितल्यावर त्याच्या घरच्यांनी आरोपीला साथ दिल्याचे पीडित तरुणीचे म्हणणे आहे.
शेतात नेऊन केला बलात्कार
'गावातील २३ वर्षीय तरुणाने लग्न करण्याच्या बहाण्याने माझ्या मुलीवर जवळपास दोन वर्षे लैंगिक अत्याचार केला. काही दिवसांपूर्वी मुलीने तरुणावर लग्नासाठी दबाव टाकला. 31 मे 2023 रोजी आरोपीने माझ्या मुलीला जवळच्या शेतात नेले आणि तिच्यावर पुन्हा बलात्कार केला. ही घटना घडत असताना आरोपीच्या चुलत भावांनी आजुबाजूला लक्ष ठेवले. तसेच माझ्या मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली' अशी तक्रार १९ वर्षीय पीडितेच्या वडिलांनी दिली आहे. यासंदर्भात पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
जीवे मारण्याची धमकी
घटनेच्या एका आठवड्यानंतर ७ जून रोजी पीडितेने ही बाब तिच्या वडिलांना सांगितली. पीडितेच्या वडिलांनी तरुणाच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला असता त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. एवढेच नाही तर पोलिसात गेल्यास जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. मात्र, मुलीच्या वडिलांनी हिंमत दाखवत याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली.
FIR विरोधात आक्षेप
एफआयआरमध्ये आरोपीच्या 90 वर्षीय आजोबांसह आरोपी तरुणाच्या कुटुंबातील 10 जणांची नावे आहेत. दरम्यान, आरोपीच्या कुटुंबीयांनी बुधवारी बुलंदशहरचे वरिष्ठ एसपी श्लोक कुमार यांची भेट घेतली आणि एफआयआरवर आक्षेप घेतला. एसएसपींनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.