UP Crime: लग्नाबद्दल नवरी मुलीच्या मनात खूप स्वप्न असतात. लग्नमंडपात नवरा मुलगा वाजत गाजत वरात घेऊन येईल आणि आपल्या घेऊन जाईल. या एक स्वप्नासाठी तिने आयुष्यभर वाट पाहिलेली असते. उत्तर प्रदेशातील एक नवरी देखील हेच स्वप्न प्रत्यक्षात जगत होती पण अचानक तिचे स्वप्नभंग झाले. लग्नाची पूर्ण तयारी झाली होती, मांडव सजला होता. हाताला नटून थटून, हाताल मेहंदी लावून ती तयार होती, वऱ्हाडी देखील लग्नाला आले होते. पण ऐनवेळी नवरा मुलगाच मांडवात आला नाही. यापुढे तिला मोठा धक्का बसणार होता. कारण नवरा मुलगा तिच्याऐवजी त्याच्या मावस बहिणीला घेऊन पळाला होता. त्यामुळे तिच्या हाताची मेहंदी रंगलीच नाही. कसा आणि कुठे घडला हा प्रकार याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेशातील बरेली येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका तरुणाच्या लग्नाची मिरवणूक निघणार होती. लग्नही त्याच्याच प्रेयसीसोबत निश्चित झाले होते. त्यामुळे आता फक्त लग्नाची औपचारिकता बाकी होती. सर्व जवळच्या नातेवाईक आणि मित्र परिवाराला निमंत्रण देण्यात आले होते. यासाठी दोन्ही बाजूंनी लग्नाची बरीच तयारी केली. आणि अखेर लग्नाचा दिवस आला. पण त्यादिवशी भलताच प्रकार घडला. 


BMC Job: मुंबई पालिकेत नवीन भरती; पदवीधरांना 1 लाखापर्यंत मिळेल पगार


नवरा लग्नगाठ बांधण्याऐवजी आपल्या मावस बहिणीला घेऊन पळून गेला. लग्नमांडवात तयार होऊन बसलेल्या नवरीला आधी नक्की काय सुरु आहे हे कळेनाच. पण घटना समोर आल्यानंतर तिला मोठा धक्का बसला. याची माहिती मिळताच वधूच्या नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.


नवाबगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात ही घटना घडली. आरोपी वधू-वरांमध्ये अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध सुरू होते. यानंतर मुलीने आरोपीसमोर यापूर्वी लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता मात्र त्यावेळी वराने नकार दिला. यामुळे संतापलेल्या तरुणीने पोलिसात जाऊन लग्नाच्या बहाण्याने आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांच्या उपस्थितीत दोन्ही बाजूंची मिटींग झाली होती.


या मिटींगमध्ये आरोपीने सर्वांसमोर आपल्या प्रेयसीसोबत लग्नासाठी होकार दिला आणि त्यासाठी तारीख निश्चित करण्यात आली. ठरलेल्या करारानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी लग्नाची तयारी सुरू केली. सर्व पाहुण्यांना आमंत्रणे पाठवली गेली. लग्नमांडव सजला. मात्र मिरवणूक न आल्याने नवरीकडच्यांना मोठा धक्का बसला. त्यांनी वराच्या घरी याबद्दल माहिती विचारली. यावेळी नवरा आपल्या मावस बहिणीसोबत पळून गेल्याची माहिती त्यांना देण्यात आली.


Central Railway Job: मध्य रेल्वेत हजारो पदांची भरती, दहावी उत्तीर्णांना मुंबईत चांगल्या पगाराची नोकरी


यानंतर कुटुंबीयांसह पोलिसात पोहोचलेल्या वधूने पुन्हा एकदा आरोपी वराच्या विरोधात तक्रार दिली आहे. याप्रकरणी वधूच्या वडिलांनीही आपल्या होणाऱ्या पाहुण्यांविरुद्ध तक्रार दिली आहे. नवाबगंज पोलिस स्टेशनचे प्रभारी राजीव कुमार सिंह यांनी या घटनेला दुजोरा दिला. वधूच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून तपास सुरू करण्यात आल्याचे सांगितले. आरोपी वराचा शोध सुरू आहे.