फेसबुकवरचा मित्र चाकू घेऊन लग्न झालेल्या महिलेच्या घरात घुसला..पुढे झालं ते धक्कादायक..
UP Crime: आरोपी मनोजने पत्नीच्या छाती आणि हातावर चाकूने वार केले.
UP Crime: फेसबुकच्या आभासी जगात लोक एकत्र येऊ लागली आहेत. यातून मैत्री होऊन नाती बनण्याच्या, बिघडण्याच्या अनेक घटना समोर येतात. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका लग्न झालेल्या महिलेने फेसबुकवर तरुणाशी मैत्री केली. यानंतर काही कारणाने तिने त्याला ब्लॉक केले. यानंतर घडलेला प्रकार फार भयानक होता.
ताजनगरी आग्रा येथे एक धक्कादायक प्रकार घडला. येथे एक माथेफिरु तरुण लग्न झालेल्या महिलेच्या घरात घुसला. तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने महिलेच्या छातीवर आणि हातावर चाकूने हल्ला केला. अचानक घडलेल्या या प्रसंगामुळे महिला खूपच घाबरली. बचावासाठी ती आरडाओरडा करु लागली. तिचा आवाज ऐकून सर्व कुटुंबीय तेथे पोहोचले यानंतर तरुणाने स्वत:वर चाकूने वार करून जखमी केले. यासंदर्भात पोलिसांनी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे पीडितेच्या कुटुंबात भीतीचे वातावरण आहे.
'काही कामानिमित्त मी सोमवारी लखनऊला गेला होतो. घरात पत्नी, दोन मुले आणि 70 वर्षीय वडील होते. संध्याकाळी पत्नी कपडे इस्त्री करत होती. तेवढ्यात राजपुरी चुंगी येथील मनोज घरात शिरला. त्याच्या हातात चाकू होता. त्याने पत्नीवर चाकूने हल्ला करण्यास सुरुवात केली.' दोघांमध्ये झटापटी झाल्याचे पिडित महिलेच्या पतीने पोलिसांना सांगितले.
आरोपी मनोजने पत्नीच्या छाती आणि हातावर चाकूने वार केले. ती जखमी झाली. आवाज ऐकून वडील आले. त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र मनोजने त्याच्यावरही हल्ला केला. त्याच्या हातातील चाकूने त्याने वडिलांनाही जखमी केले. तितक्यात माझा भाऊ बाजारातून घरी आला. हे पाहून आरोपीने स्वतःवर चाकूने हल्ला करायला सुरुवात केली. त्याने स्वतः ला जखमी केल्याचे पतीने पोलिसांना सांगितले.
आरोपीला मिळाला जामीन
घटनेच्या काही वेळानंतरमाहिती मिळताच पोलीस घरी पोहोचले आणि त्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. आरोपी मनोजविरुद्ध घरात घुसून मारहाण, शिवीगाळ आणि मारहाण या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस ठाण्याचे प्रभारी प्रदीप कुमार यांनी दिली.
आरोपी महिलेला फेसबुकवर भेटल्याचे समोर आले. तो मेसेज करू लागला. यावर महिलेने त्याला अडवले. घरी येऊन धमक्या देऊ लागला. त्याने लग्नाचा हट्ट धरला. यामुळे कुटुंबीय घाबरल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले. तेथून त्याला जामीन मिळाला. आरोपीने हत्येचा प्रयत्न केला पण पोलिसांनी ते कलम लावले नसल्याचा आरोप महिलेच्या कुटुंबियांनी केला आहे.