UP Crime : उत्तर प्रदेशाच्या प्रयागराजमधून एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. प्रयागराजमध्ये चालत्या बसमध्ये एका तरुणाने बस कंडक्टरवर चॉपरने हल्ला केला. कंडक्टरवर हल्ला केल्यानंतर आरोपीने बसमधून पळ काढला. जखमी बस कंडक्टरला प्रयागराज येथील एसआरएन रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तर दुसरीकडे हल्ला करणाऱ्या आरोपीचा पोलिसांनी शोध घेऊन त्याला अटक केली आहे. अटकेनंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला पोलिसांनी पायावर गोळी मारून जखमी केले आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धावत्या बसमध्ये केला हल्ला


शुक्रवारी प्रयागराज औद्योगिक परिसरातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर बी.टेकचा विद्यार्थी असलेल्या लरेब हाश्मी याने तिकीटाच्या वादातून चापर येथील ई-बस कंडक्टर हरिकेश विश्वकर्मा यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. विश्वकर्मा यांच्या मानेवर हाश्मी याने धारदार शस्त्राने वार केले. बसमध्ये असलेल्या रोडवेजच्या दुसऱ्या कर्मचाऱ्याने विरोध केला असता त्याच्यावरही हल्ला करण्यात आला. यानंतर लरेब हाश्मी याने बसमधून पळ काढला आणि एक धार्मिक टिप्पणी करणारा एक व्हिडिओ बनवला ज्यामध्ये तो म्हणत आहे की पैगंबर साहेबांचा अपमान केल्यामुळे मी त्याच्यावर हल्ला केला.


कंडक्टर रुग्णालयात दाखल


मिळालेल्या माहितीनुसार, या व्हिडिओमध्ये आरोपीने कंडक्टरवर हल्ल्याचे कारण सांगितले होते. या सर्व प्रकारादरम्यान पोलिसांनी आरोपी लरेब हाश्मीला अटक केली. या घटनेत वापरलेले हत्यार जप्त करण्यासाठी नेले असता हाश्मीने पोलिसांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही गोळीबार केला त्यामुळे आरोपी तरुणाच्या पायाला गोळी लागली. आरोपी लरेब हाश्मीला प्रयागराज येथील एसआरएन रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 


प्रयागराजमध्ये इलेक्ट्रिक बसमध्ये प्रवास करणाऱ्या इंजिनीअरिंगचा विद्यार्थी लरेब हाश्मी आणि बस कंडक्टर हरिकेश विश्वकर्मा यांच्यात बस तिकीटावरून वाद झाला. हा वाद इतका वाढला की लरेब हाश्मी याने बस कंडक्टर हरिकेश विश्वकर्मा यांच्यावर धारदार चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या हरिकेश विश्वकर्मा यांच्या मानेला व हाताला गंभीर दुखापत झाली. या हल्ल्यानंतर बसमध्ये सगळीकडे रक्त सांडलं होतं.


हल्लानंतर व्हायरल केला व्हिडीओ


अचानक घडलेल्या या घटनेने बसमध्ये एकच खळबळ उडाली. विद्यार्थी घाबरून ओरडू लागले. विद्यार्थ्यांनी बसमधून उतरून कॉलेजकडे धाव घेतली. या घटनेनंतर जखमी हरिकेश विश्वकर्मा यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यानंतर आरोपी लरेब पळून गेला. त्यानंतर त्याने धार्मिक टिप्पणी करणारा एक व्हिडिओ बनवला ज्यामध्ये तो म्हणत आहे की मी त्याला मारले आहे, तो जिवंत राहणार नाही. उर्दू आणि पर्शियन शब्दांचा वापर करून बनवलेला 128 मिनिटांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.


दुसरीकडे पोलिसांनी आरोपी लरेब हाश्मी याला महाविद्यालयाच्या परिसरातूनच अटक करून पोलीस ठाण्यात आणले. त्यावेळई आरोपीने त्याच्याजवळ लपवून ठेवलेल्या बंदुकीतून पोलिसांवर गोळीबार केला. यामध्ये पोलीस कर्मचारी थोडक्यात बचावले. मात्र प्रत्युत्तरात केलेल्या गोळीबारात आरोपी लरेब हाश्मीच्या पायाला गोळी लागली. प्राथमिक तपासात हा वाद विश्वकर्मा यांच्यासोबत बसच्या भाड्यावरून झाल्याचे म्हटलं जात होते. मात्र सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये आरोपी म्हणत आहे की, तो आमच्या धर्माबाबत चुकीचे बोलला होता, म्हणून मी त्याच्यावर हल्ला केला. याप्रकरणी पोलीस अद्याप तपास करत आहेत.