सूनेची अब्रू वाचवण्यासाठी सासूने केली पतीची हत्या; मध्यरात्री घराबाहेरच हत्येचा थरार
UP Crime : उत्तर प्रदेशात काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीची त्याच्या घराबाहेरच गळा चिरून हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी याप्रकरणी आता सखोल तपास करुन पतीच्या हत्येप्रकरणी पत्नीलाच अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Crime News : उत्तर प्रदेशात (UP Crime) एका पत्नीने तिच्या पतीची विळ्याने हत्या केल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी (UP Police) आता या प्रकरणात महत्त्वाचा खुलासा केला आहे. बदायू इथल्या एका गावात तेजेंद्र नावाच्या व्यक्तीची त्याच्याच पत्नीने निर्घृणपणे हत्या केली होती. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी त्याच्या पत्नीला अटक केली आहे. पोलिसांनी याप्रकरणात केलेल्या खुलाशानंतर सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली आहे. आपल्या 19 वर्षीय सुनेचे होणारे लैंगिक शोषण रोखण्यासाठी पत्नीने स्वतःच्या पतीचा गळा चिरला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 ऑगस्ट रोजी खेळणी बनवणाऱ्या तेजेंद्र सिंगची (43) त्याच्या बिलसी शहरातील घराच्या अंगणात झोपलेला असताना संशयास्पद स्थितीत हत्या करण्यात आली होती. तेजेंद्रची हत्या अज्ञात व्यक्तीने केल्याचा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केला जात होता. मात्र पोलिसांनी तेजेंद्र हत्या प्रकरणाचा पर्दाफाश करत त्याच्या पत्नीला अटक केली आहे. पोलिसांच्या चौकशीदरम्यान, तेजेंद्रची पत्नी मिथिलेश देवी सातत्याने तिचा जबाब बदलत होती. त्यामुळे पोलिसांना तिच्यावर संशय निर्माण झाला होता. पोलिसांनी तिच्याकडे कसून चौकशी केली असता तिने हत्येची कबुली दिली.
मृत तेजेंद्र हा मुलाच्या पत्नीवर वाईट नजर ठेवत असे. या कारणावरून पती-पत्नीमध्ये अनेकदा वाद होत होते. अनेक वेळा समजावूनही मयत तेजेंद्र ऐकत नव्हता. आरोपी पत्नीने सांगितले की, माझ्या सुनेचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले असून सुमारे वर्षभरापासून माझा पती सुनेवर वाईट नजर ठेवून होता.
14 ऑगस्टच्या रात्री काय घडलं?
मिथिलेशने पोलिसांना सांगितले की, "तेजेंद्र तिला अनेकदा मारहाण करायचा आणि तिच्या सुनेला त्याच्यासोबत शरीरसंबंध ठेवण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी तिच्यावर दबाव टाकत होता. माझ्या नवऱ्यापासून सुटका करून घेण्यासाठी मी संधी शोधत होते. त्या रात्री तो मद्यधुंद अवस्थेत घरी आला आणि बाहेरच झोपला होता. अचानक तो सुनेच्या खोलीत घुसू लागला. तो तिच्यावर बळजबरी करत होती. ती जोरजोरात ओरडत होती. हे पाहून मी तिला वाचवण्यासाठी तेजेंद्रचा गळा चिरला. त्याचा गळा चिरण्यासाठी मी विळ्याचा वापर केला. माझ्या मुलीला वाचवण्यासाठी मी हे केलं."
दरम्यान, बदाऊचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक डॉ. ओ.पी. सिंग यांनी सांगितले की, "पत्नीने तिच्या पतीचा विळ्याने गळा चिरून खून केला. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. याबाबत सुनेचीही चौकशी करण्यात येत आहे. तिचे सासरच्यांशी खरेच अवैध संबंध होते की आणखी काही, याचा शोध घेतला जात आहे."