लव्ह, S*x और धोका! बेडरुममध्ये घुसून प्रेयसीने बॉयफ्रेंडच्या बायकोचा गळा चिरला; म्हणाली, `शरीरसंबंध..`
Woman Attack Newlywed Bride: कोणाला काही कळण्याच्या आत ही तरुणी घरात शिरली आणि थेट बेडरुममध्ये गेली. तिथे तिने या नवविवाहितेवर आरडाओरड करत थेट हल्लाच केला. या प्रकरणाची सध्या पंचक्रोषीमध्ये चर्चा आहे.
Woman Attack Newlywed Bride: उत्तर प्रदेशमधील वाराणसीमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रियकराचं लग्न होत असल्याचं समजल्यानंतर त्याच्या प्रेयसीने संतापून प्रियकराच्या पत्नीवर प्राणघातक हल्ला केला. ही तरुणी या नवविवाहितेच्या बेडरुममध्ये शिरली आणि तिने तिचा गळा चिरला. या नवविवाहितेच्या गळ्यावरुन चाकू फिरवताना हल्ला करणारी तरुणी, "जो मेरा नाही वो किसी का भी नही" असं मोठमोठ्याने ओरडत होती. जखमी अवस्थेत नवविवाहितेला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. हा हल्ला सध्या येथील पंचक्रोषीमध्ये चर्चेचा विषय असून एक महिला इतक्या क्रूरपणे दुसऱ्या महिलेशी वागू शकते यावर स्थानिकांना विश्वास बसत नाहीये.
बेडरुममध्ये घुसून गळा चिरला
हा सारा प्रकार वाराणसीमधील चोलापूर परिसरामध्ये घडला. ही नवविवाहिता तिच्या बेडरुममध्ये झोपलेली असतानाच तिच्यावर हल्ला झाला. पतीचे दुसऱ्या एका मुलीबरोबर प्रेमसंबंध असल्याचं समजल्यानंतर तिचं पतीबरोबर भांडण झालं होतं. ही महिला तिच्या बेडरुममध्ये असतानाच अचानक तिच्या पतीची प्रेयसी बेडरुममध्ये आली आणि तिने माहिलेच्या गळ्यावरुन चाकू फिरवला. या महिलेच्या गळ्यातून भळाभळा रक्त गळत असताना हल्लोखर तरुणी तिच्यावर ओरडत होती. "माझ्या आणि माझ्या प्रियकराच्या मध्ये जो कोणी येईल त्याचं हे असंच होईल" असं हल्लेखोर तरुणी ओरडून रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या महिलेला सांगत होती.
हल्ला झाल्याचं समजल्यानंतर एकच गोंधळ
काही दिवसांपूर्वीच घरी आलेल्या सूनेवर प्राणघातक हल्ला झाल्याचं समजल्यानंतर घरात एकच खळबळ उडाली. तातडीने या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि तिच्यावर वेळीच उपचार झाल्याने तिचे प्राण वाचले. पोलिसांनी हल्लेखोर महिलेला अटक केली आहे. पोलिसांनी या प्रकरणामध्ये अटक केलेल्या माहिलेची ओळख प्रिया शर्मा अशी पटली असून तिच्या प्रियकराचं नाव बबलू अन्सारी असं आहे.
अनेकदा ठेवले शरीरसंबंध
प्रियाच्या आईने बबलूविरुद्ध तक्रार केल्यानंतर त्यालाही पोलिसांनी अटक केली आहे. हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी प्रियाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या तपासामध्ये प्रियाने तिचं आणि बबलूचं मागील तीन वर्षांपासून प्रेमप्रकरण सुरु होतं असं सांगितलं. लग्न करण्याचं आश्वासन देत बबलूने मागील तीन वर्षांमध्ये अनेकदा माझ्याशी शरीरसंबंध ठेवल्याचा आरोपही प्रियाने केला आहे.
...म्हणून केला हल्ला
आपल्याला बबलूशी लग्न करायचं होतं, असंही प्रियाने पोलिसांना सांगितलं. मात्र आमचे धर्म वेगळे असल्याने आम्हाला लग्न करता आलं नाही, असा प्रियाचा दावा आहे. आपल्याला बबलूची पत्नी अशी ओळख हवी असल्याने आपण त्याची पत्नी रोशनवर प्राणघातक हल्ला केल्याचं प्रियाने सांगितलं.