`प्रत्येकवेळी मुलाचीच चुक नसते...` चिठ्ठी लिहित B.Pharma विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल
बी फार्मा शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. राहात्या घरात गळफास घेत या मुलाने टोकाचं पाऊल उचललं. पोलिसांना त्याच्या घरातून सुसायड नोट मिळाली आहे.
Crime News : प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून एका तरुणाने आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तो राहात असलेल्या घरातच या मुलाने गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी या तरुणाने फेसबूकवर (Facebook) आपल्या प्रेयसिचा (Girlfriend) फोटो शेअर करत आपल्या आत्महत्येला हिच जबाबदार असल्याचं सांगितलं. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तरुणाचा मृतदेह ताब्यात घेतला. याप्रकरणी पुढचा तपास सुरु आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
उत्तरप्रदेशमधल्या (Uttarpradesh) मोहब्बतपूरमधल्या कामा गावातील ही घटना आहे. या गावात छोटेलाल यादव हा शेतकरी आपल्या कुटुंबासह राहातो. छोटेलालला दोन मुलं आणि एक मुलगी आहे, मुलीचं एका वर्षापूर्वी लग्न झालं. तर मोठा मुलगा दिल्लीत एका खासगी कंपनीत नोकरी करतो. सर्वात लहान मुलाचं नाव राहुल असं होतं आणि तो सिराथू इथल्या फार्मा कॉलेजमध्ये शिकत होता.
कोरोना काळात राहुल एका आरोग्य केंद्रात नोकरी करत होता. याच वेळी त्याची ओळख तिथे काम करणाऱ्या एका मुलीशी झाली. दोघांमध्ये मैत्री झाली आणि पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. तीन वर्ष त्यांचे प्रेमसंबंध होते. पण गेल्या काही दिवसांपासून राहुल नैराश्यात होता. यातूनच शुक्रवारी त्याने घरात गळफास घेत आत्महत्या केली. आत्हमत्येपूर्वी त्याने सुसायड नोट (Suicide Note) लिहिली होती. आपल्या मृत्यूला त्याने त्या मुलीला जबाबदार धरलं.
आत्महत्येपूर्वी राहुलने प्रेयसीबरोबरचा आपला फोटो फेसबूकवर शेअर केला आणि त्याबरोबर त्याने एक कॅप्शनही लिहिला होता. 'माझं आयुष्य हिने खराब केलं' असं त्यात म्हटलं होतं. याशिवया राहुलने लिहिलेल्या चिठ्ठीत 'या मुलीने मला लग्नाचं वचन दिलं तीन वर्ष आम्ही एकत्र होता. पण आता आपला काहीही संबंध नसल्याचं ती म्हणतेय' असं म्हटलंय. गेल्या काही महिन्यांपासून ती आपलं मानसिक खच्चिकरण करत आहे. आता मला हे सहन होत नाही.
आधी माझ्याबरोबर रात्र-रात्र फोनवर बोलायची आणि आता फोनही उचलत नाही. या मुलीने माझं आयुष्य बर्बाद केलं आहे. याला जबाबदारी तीच आहे. तिला कठोर शिक्षा मिळावी. प्रत्येक वेळी मुलाचीच चूक नसते, असं लिहित राहुलने आपलं आयुष्य संपवलं. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरुन चिठ्ठी ताब्यात घेतली असून कुटुंबियांना त्या मुलीविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तरुण मुलाच्या जाण्याने त्याच्या कुटुबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.