UP Crime: लग्न सोहळा म्हटला की मुलीच्या वडिलांना हुंडा काय द्यायचा ही सर्वात मोठी काळजी असते. एकीकडले हाताखांद्यावर खेळवलेली लाडकी लेकं घर सोडून जात असते. त्यात त्यात सासऱ्यांचे हुंडाप्रेमी असतील तर मुलीचा संभाळ नीट करतील का? याचेही विचार मनात असतात. बऱ्याच ठिकाणी हुंडा पद्धतीवर कायद्याने बंदी घातली आहे. तरीही कायद्याला न जुमानता ही प्रथा सुरुच आहे. आता मुलीचे वडीलही जागरुक झाले आहेत. असाच एक प्रकार समोर आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेशातील कानपूर देहाटमध्ये लग्न मंडपात विचित्र प्रकार घडला. वऱ्हाडासोबत मंडपात पोहोचलेल्या नवरदेवाने नवरीच्या वडिलांकडे  बुलेट आणि एक लाखांची मागणी केली. नवरीच्या वडिलांनी ही मागणी फेटाळून लावली. त्यानंतर त्याने वऱ्हाड मागे फिरविले. वराची मागणी पूर्ण न झाल्याने नवरदेव आणि त्याच्या कुटुंबीयांनी नवरीला न घेता वऱ्हाड मागे फिरविले. यानंतर वधूच्या वडिलांनी नवरदेवासह ५० वऱ्हाड्यांची तक्रार पोलिसात केली.
याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून अधिक तपास सुरु आहे.


रुरा पोलीस स्टेशन हद्दीतील नौरंगाबाद येथील रहिवासी मोतीलाल यांनी पोलीस ठाण्यात अतिरिक्त हुंड्याबाबत तक्रार दिली. दिलेल्या तक्रारीनुसार, 'माझ्या मुलीचे लग्न अहिरन गाधेवा येथील मुन्नू सिंग उर्फ ​​मुन्नू पाल यांचा मुलगा बादल याच्यासोबत निश्चित झाले होते. 18 जूनच्या ठरलेल्या तारखेला वऱ्हाड तिगई येथील एका अतिथीगृहात आले. तिथे आम्ही त्यांचे जल्लोषात स्वागत केले.


लग्नाचा पुढचा विधी आटोपून वरात मंडपात पोहोचली. तेथे वराकडून हुंड्याची अतिरिक्त मागणी करण्यात आली. त्यात एक बुलेट आणि एक लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचे', त्यांनी सांगितले. 


यादरम्यान वऱ्हाड आणि उपस्थित लोकांमध्ये हाणामारी झाली. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी दोन्ही पक्षांना समज देऊन प्रकरण मिटवले.


पोलिसांकडून अधिक तपास सुरु 


वधूच्या वडिलांनी तक्रारीत म्हटले आहे की, 9 जून रोजी वराने दुचाकी खरेदी केली होती. त्यानंतरही त्याने पुन्हा बुलेट आणि हुंड्यात एक लाख रुपयांची मागणी सुरू केली. वधूच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी वरासह 50 वऱ्हाड्यांवर गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीस या प्रकरणाचा तपास करत असल्याची माहिती अकबरपूरचे सीओ अरुण कुमार सिंह यांनी दिली. नवरदेवाच्या एका चुकीमुळे नटून-थटून आलेल्या वऱ्हाडाला पोली