उत्तर प्रदेश सरकार आग्रा शहराचं नाव बदलण्याच्या तयारीत
आणखी एका शहराचं नाव बदलणार...
लखनऊ : उत्तर प्रदेश सरकार आग्रा शहराचं नाव बदलण्याच्या तयारीत आहे. आग्राचं नाव बदलून अग्रवन ठेवण्यात येऊ शकतं. डॉक्टर भीमराव आंबेडकर विद्यापीठाकडे याप्रकरणी सरकारनं पुरावे मागितले आहेत. याप्रकरणी विद्यापीठ पुरावे गोळा करण्याचं काम करतंय. याआधी उत्तर प्रदेश सरकारनं अलाहाबादचं नाव बदलून प्रयागराज असं केलं होतं. तसंच ऐतिहासिक मुगलसराय रेल्वे स्टेशनचं नाव बदलून दीनदयाल उपाध्याय केलं होतं. नुकतंच फैजाबाद जिल्ह्याचं नाव बदलून अयोध्या ठेवण्यात आलं आहे.
२०१७ मध्ये उत्तरप्रदेशमध्ये सत्ता आल्यानंतर योगी सरकारने नावं बदलण्यासाठी प्रयत्न सुरु केला. आग्रा येथील भाजपचे नेते जगन प्रसाद यांनी शहराचं नाव बदलण्याची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र देखील लिहिलं आहे.
शहरात मोठ्य़ा प्रमाणात झाडं असल्याने आणि महाराजा अग्रसेनचे चाहते या शहरात असल्याने या शहराचं नाव आगरावन करण्याची मागणी त्यांनी केली.