बँकेत काढायला गेला 100 रुपये, बँक बॅलेन्स पाहून मजूराला बसला धक्का, वाचा नेमकं काय घडलं
रोजंदारीवर काम करणारा मजूर रातोरात बनला करोडपती, पण...
Viral News : काही लोकं रातोरात स्टार होतात, तर काही लोकांचं नशीब एका रात्रीत पालटतं. अशीच एक घटना समोर आली आहे. दैनंदिन रोजंदारीवर काम करणारा एक मजूर रातोरात करोडपती बनला. पण फक्त काही तासांसाठीच. उत्तर प्रदेशमधल्या कन्नौजमधला एका मजूराच्या बँक खात्यात अचानक करोडो रुपये जमाल झाले. (cash withdrawal bank )
नेमकी घटना काय?
कन्नौरच्या कमलापूर गावातील 45 वर्षांचे बिहारी लाल यांचं बँक ऑफ इंडियामध्ये जन धन खातं आहे. या खात्यातून 100 रुपये काढण्यासाठी ते बँकेत गेले होते. पैसे काढल्यानंतर त्यांना बँकेकडून मेसेज आला. त्यात त्यांच्या बँक खात्यात असलेली रक्कम नमूद करण्यात आली होती. त्याच्या खात्यात चक्क 2,700 कोटी रुपये बॅलेन्स दाखवत होते. इतकी मोठी रक्कम पाहून बिहारी लाल यांना धक्काच बसला.
आपल्या बँक खात्यात २,७०० कोटी रुपयांहून अधिक रक्कम असल्याचं पाहून बिहारी लाल यांना धक्काच बसला . पावसाळ्यात काम बंद असल्याने ते गावी आले होते. बिहारी लाल हे रोजंदारीतून 600 ते 800 रुपये कमावतात.
बँक खात्यात एकूण 126 रुपये होते
बिहारीलाल यांनी एका मित्राला खातं तपासण्यास सांगितलं, त्यावर त्यांच्या खात्यात 27,07,85,13,985 जमा झाल्याचे सांगण्यात आलं. लाल यांना विश्वास बसला नाही तेव्हा अधिकाऱ्याने त्यांना बँक स्टेटमेंट दिले. मात्र, नंतर बिहारीलाल यांनी त्यांच्या जवळच्या जनधन सेवा केंद्र शाखेत खात्यातील शिल्लक तपासली असता, ती फक्त 126 रुपये दाखवत होती. कदाचित तांत्रिक चुकीमुळे हा प्रकार घडला असावा.