Mother and Son Died: मोबाईल चार्जर ही प्रत्येकाच्या घरात आढळणारी, सर्वसाधारण दिसणारी वस्तू असते. पण हाच चार्जर कोणाच्या मृत्युचे कारण ठरु शकतो का? हो मोबाईल चार्जने आई आणि मुलाचा मृत्यू ओढावला आहे. या घटनेनंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. उत्तर प्रदेशातील सीतापूरमध्ये ही घटना घडली आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सीतापूरच्या रामपूर मथुरातील भगवतीपूर गावात रोहित जयस्वाल आणि त्याची आई रामशेली जैस्वाल एकाच खोलीत झोपले होते. रात्री उशिरापर्यंत मोबाईल पाहिल्यानंतर रोहितने फोन चार्जिंगला लावला आणि त्याच्याजवळ कॉटवर ठेवून तो झोपी गेला. दरम्यान मध्य रात्री मोबाईल चार्जरमधून अचानक करंट आला. या करंटने रोहितला आपल्या विळख्यात ओढले. करंटचा धक्का इतका जोरदार होता की रोहित करंटने काळा पडू लागला होता. पोटचा मुलगा जळत असल्याचे पाहून आईने त्याला वाचवण्याचा प्रयत्न सुरू केला. आई जवळ गेली आणि त्याला खेचू लागली. यावेळी   आईलाही विजेचा धक्का बसला. 


तलाठी भरतीचे वेळापत्रक जाहीर, 11 लाख उमेदवारांची 3 टप्प्यात परीक्षा


या अपघातात आई आणि मुलगा दोघांची दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर आजूबाजूच्या गावातील लोक भयभीत झाले आहेत. स्विच आणि इलेक्ट्रिकल उपकरणांना स्पर्श करताना काळजी घ्या तसेच फोन दूर ठेवून चार्जिंग करा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. 


पतीच्या मृत्यूनंतर 2 तासात पत्नीनेही सोडला जीव


दुसरीकडे उत्तरप्रदेशच्या झांसी येथे आणखी एक दुर्देवी घटना घडली आहे. यात पतीचा मृत्यू झाल्यानंतर हे दु:ख सहन न झाल्याने पत्नीनेही जीव सोडला. यानंतर त्यांची ही प्रेमकहाणी चर्चेचा विषय ठरत आहे. पण एकाच घरातून एकावेळी दोन मृतदेह बाहेर पडल्याने नातेवाईकांसह गावकऱ्यांनाही अश्रू अनावर झाले होते. 


बघौरा गावात राहणारे 50 वर्षीय प्रीतम रविवारी नेहमीप्रमाणे आपल्या म्हशी चरण्यासाठी शेतात गेले होते. बघौरा गावात पावसाळ्यात बंधाऱ्याचे पाणी शेताच्या वाटेवर येते. प्रीतम शेतात गेले होते तेव्हा पाण्याची पातळी कमी होती. मात्र आजूबाजूच्या भागात पाऊस झाल्याने पाण्याची पातळी अचानक वाढली. पण प्रितम यांना याची अजिबात कल्पना नव्हती. 


संध्याकाळी घरी परतत असताना प्रितम हे पाण्यात बुडाले आणि मृत्यू झाला. प्रितम बराच वेळ झाला तरी शेतातून घरी परतले नसल्याने नातेवाईकांनी त्यांचा शोध सुरु केला होता. यावेळी बंधाऱ्याच्या किनारी प्रितम यांची चप्पल सापडली. यानंतर नातेवाईकांना पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस यानंतर घटनास्थळी दाखल झाले आणि बंधाऱ्यात मृतदेहाचा शोध सुरु केला. यावेळी डायव्हर्सची मदत घेण्यात आली. यानंतर बंधाऱ्यातच प्रितम यांचा मृतदेह सापडला. त्यांच्यातील प्रेम इतकं होतं की अंत्यसंस्काराच्या दोन तास आधीच गीता यांनीही आपले प्राण सोडले. यानंतर सर्व नातेवाईकांनाही धक्का बसला. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्यात फार प्रेम होतं. ते एकमेकांवर फार प्रेम करत होते. त्यांना एक मुलगा आणि दोन मुली आहेत. तिघांचंही लग्न झालं आहे. 


भारतीय टपाल खात्यात दहावी उत्तीर्णांना नोकरीची संधी, 'ही' घ्या अर्जाची लिंक