उत्तर प्रदेश : आता बातमी एका निस्सीम चाहत्याची. उत्तर प्रदेशमधल्या (Uttar Pradesh) एटाहच्या अलीगंज तहसील भागातील कसबा सराय घाट इथं राहणारा यामीन सिद्दीकी हा राज्याचे मुख्यमंत्री सीएम योगी (CM Yogi Adityanath) यांची जबरदस्त फॅन आहे. एखाद्या बॉलीवूड फॅनपेक्षाही यामीन योगी आदित्यनाथ यांचा फॅन आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यामीनने आपल्या छातीवर चक्क मुख्यमंत्री योगींचा टॅटू काढला आहे.  मुख्यमंत्र्यांना भेटून हा टॅटू दाखवण्याची त्यांची इच्छा आहे. यामीनचं शहरातच चप्पलचं दुकान आहे. 


2017 मध्ये यामीनवर सपा छात्रसभेत शहराध्यक्षपदाची जबाबदारी होती आणि सलग चार वर्षे त्याने तिथे काम केलं. त्यानंतरही त्याचे सपाशी संबंधीत गोता. पण अवघ्या दोन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या भाषणाने त्याचं मन बदललं. तेव्हापासून तो सीएम योगींचा चाहते बनलाय. 



यामीने सीएम योगींची भाषणे आणि व्हिडिओ बघायला आणि ऐकायला सुरुवात केली. त्यांच्या भाषणाने तो इतका प्रभावित झाला की, 22 मे रोजी त्याने फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल तयार करून योगींच्या पोस्ट आणि व्हिडिओ अपलोड आणि शेअर करण्यास सुरुवात केली.


मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वाढदिवसानिमित्ताने यामीन 4 जूनला आगराला गेला. तिथे त्याने आपल्या छातीवर योगींचा टॅटू गोंदवला. 


यामीनने सांगितलं की, कुटुंबातील सर्वजण त्यांच्या या निर्णयाशी सहमत आहेत. भाजप आणि योगी सरकारच्या धोरणांवर सर्वजण समाधानी आहेत. मात्र, मुस्लिमबहुल शहरातील काही लोकांचा त्याला विरोधही होत आहे.



प्रत्येक गोष्टीत समर्थन आणि विरोध हा असतोच असं यामीनचं म्हणणं आहे. उत्तर प्रदेशमध्ये असा एकही नेता नाही, ज्याचं काम आपल्याला आवडलं असंही यामीन म्हणतो.


यामीनने सांगितले की, त्याला मुख्यमंत्री योगी यांचा साधेपणा आवडतो. त्यांच्या आणि पक्षाच्या 'सबका साथ सबका विकास' धोरणाचा त्यांच्यावर प्रभाव पडला आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे पंतप्रधान आवास योजना. ज्यामध्ये भेदभाव न करता सर्वांना घरे बांधण्यासाठी अडीच लाख रुपये देण्यात आले. या योजनेंतर्गत शहरातील अनेक मुस्लिम समाजातील लोकांची घरे बांधण्यात आली आहेत.