Trending News : सर्वोच्च न्यायालयाने 2017 मध्ये दिलेल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयात तिहेरी तलाकला (Triple Talaq ) असंवैधानिक घोषित केलं होतं. यानंतर नरेंद्र मोदी सरकारने (Narendra Modi Government) 2019 मध्ये एक कायदा करून तिहेरी तलाक हा गुन्हा घोषित केला होता. पण यानंतरही तिहेरी तलाकच्या काही घटना समोर येत आहेत. अशीच एक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. एका पतीने आपल्या पत्नीला तिहेरी तलाक दिला. पण यासाठीच कारण मात्र अगदीच विचित्र होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमकी काय आहे घटना
उत्तर प्रदेशमधल्या (Uttar Pradesh) मेरठमधलं (Meerut) हे प्रकरण असून इथे राहणारी 28 वर्षीय महिलेल्या तिच्या पतीने तिहेरी तलाक (Triple Talaq) दिला. कारण होतं लग्नानंतर ती लठ्ठ झाली. याप्रकरणी महिलेने पोलिसात (Police) तक्रार दिली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी पीडित महिलेच्या पतीला अटक केली. या दोघांच्या लग्नाला आठ वर्ष झाली असून त्यांना सात वर्षांचा एक मुलगाही आहे.


मेरठमधल्या 28 वर्षांच्या नजमा बेगम यांचं लग्न मोहम्मद सलमान यांच्याशी आठवर्षांपूर्वी झालं. लग्नानंतर नजमा बेगम यांचं वजन वाढत गेलं. यावरुन मोहम्मद सलमान तिला टोमणे मारायला सुरुवात केली. प्रकरण इतकं वाढलं की मोहम्मद सलमानने नजमा बेगमला चक्क घराबाहेर काढलं. धक्कादायक म्हणजे मोहम्मद सलमानने तिला तिहेरी तलाकही दिला. गेल्या एक महिन्यापासून नगमा आपल्या आई-वडिलांकडे रहाते.


पोलिसांनी मोहम्मद सलमानला केली अटक
पोलिसांनी सलमानविरुद्ध मुस्लिम महिला (विवाह हक्क संरक्षण) कायदा, 2019 च्या कलम 3/4 आणि आयपीसीच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. महिलेने तिच्या तक्रारीत आरोप सलमानसह इतर पाच जण तिच्या पालकांच्या घरी जाऊन मारहाण केल्याचा आरोपही केला आहे.


सर्वोच्च न्यायालयाने 2017 मध्ये एका महत्त्वपूर्ण निर्णयात तिहेरी तलाकला असंवैधानिक घोषित केलं होतं. त्यानंतर नरेंद्र मोदी सरकारने 2019 मध्ये एक कायदा करून तिहेरी तलाक हा गुन्हा घोषित केला होता. या कायद्यात तिहेरी तलाकसाठी दोषी आढळल्यास तीन वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद आहे. त्यानंतरही तिहेरी तलाकची प्रकरणं कमी होताना दिसत नाहीत. घटस्फोटाची अनेक कारणंही विचित्र आहेत. बायको जीन्स घालते, सतत माहेरच्यांशी बोलते, नोकरी करते अशा घटनांमध्ये पत्नीला तलाक देण्यात आला आहे.