दिल्ली : उत्तर प्रदेश पोलीस (Uttar Pradesh Police) त्यांच्या कार्यपद्धतीमुळे नेहमीच चर्चेत असतात. सातत्याने उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) पोलिसांच्या कामामुळे त्यांच्यावर टीका होत असते. गुन्हेगारांना संरक्षण देण्यापासून खंडणी गोळा करण्यापर्यंत अनेक तक्रारी उत्तर प्रदेश पोलिसांच्या विरोधात तक्रारी येत असतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता एका पोलीस हवालदाराचा एक अश्लिल व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार एका महिलेबरोबर या हवालदाराचे अनैतिक संबंध असल्याचे समोर आलं आहे. 


हा हवालदार पती-पत्नीमधील वाद सोडवण्यासाठी गेला होता. यादरम्यान त्याचे पीडितेवरच प्रेम जडले. त्यानंतर आता हवालदार आणि महिला यांच्यातील अनैतिक संबंधाचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.


उन्नाव पोलिसांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. "बंगरमाऊ येथे तैनात असलेल्या हवालदार दीप सिंह यांचा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची तात्काळ दखल घेत पोलीस अधीक्षकांनी त्यांना निलंबित केले आहे. तसेच दीप सिंहला अटक करण्यात आली आहे. पोलीस विभाग अशा कोणत्याही प्रकारचे कृत्य खपवून घेणार नाही. तसेच त्याविरुद्धध कडक कारवाई करण्यात येईल," असे उन्नाव पोलिसांनी म्हटले आहे.



9 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये हवालदार बंद खोलीत एका महिलेसोबत अश्लील कृत्य करताना दिसत आहे. याची दखल घेत पोलीस अधीक्षक दिनेश त्रिपाठी यांनी हवालदारला निलंबित केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार व्हायरल झालेला व्हिडिओ दोन वर्षे जुना आहे.


पोलीस विभागात उडाली खळबळ


दरम्यान, आरोपी हवालदार त्यावेळी कोतवाली गंगा घाटावर तैनात होता. काही महिन्यांनंतर त्याची उन्नाव येथून बंगरमाऊ येथे बदली झाली. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिस विभागात खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर विभागीय तपासासोबतच पोलिसांचे पथक या महिलेचा शोध घेत आहे.