लखनऊ : कानपूर पोलीस हत्याकाडांतील आणखी एक आरोपी शशिकांत याला पोलिसांनी अटक केली आहे. यासह पोलिसांकडून लुटलेली शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. एडीजी प्रशांत कुमार यांनी मंगळवारी माहिती दिली की, पोलिसांकडून लुटलेली अनेक शस्त्रे बिकारू गावातून जप्त करण्यात आली आहेत. विकास दुबे यांच्या घरातून एके 47 आणि 17 काडतुसे सापडली आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एडीजी प्रशांत कुमार यांनी सांगितले की, आणखी एक आरोपी शशिकांत याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर 50 हजार रुपयांचे बक्षीस होते. शशिकांतने माहिती दिल्यानंतर पोलिसांनी विकास दुबे यांच्या घरातून एके-47 आणि काडतुसे जप्त केली आहेत. यासह शशिकांतच्या घरातून एक रायफलही सापडली आहे.


एडीजी प्रशांत कुमार म्हणाले की, या संपूर्ण प्रकरणात 21 आरोपी होते, ज्यात चार जणांना अटक करण्यात आली आहे. श्यामू वाजपेयी, जहान यादव, दयाशंकर अग्निहोत्री आणि शशिकांत अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या चकमकीत आतापर्यंत 6 आरोपी ठार झाले आहेत, ज्यात विकास दुबे, राजाराम, अतुल दुबे, अमर दुबे, प्रभात मिश्रा आणि प्रवीण दुबे यांचा समावेश आहे.


एडीजी प्रशांत कुमार म्हणाले की, 120 बी अंतर्गत सात जणांना अटक करण्यात आली आहे. 216 मध्ये दोन आरोपी तुरूंगात गेले आहेत. सध्या या प्रकरणात 11 जणांचा शोध सुरू आहे. याशिवाय महाराष्ट्रात पकडलेल्या दोन जणांना रिमांडवर यूपी येथे आणले जात आहे. नियमानुसार पुढील कारवाई केली जाईल.


काय आहे संपूर्ण प्रकरण


कानपूरच्या बिकूर गावात विकास दुबे आणि त्याच्या साथीदारांवर 2 जुलै रोजी रात्री पोलिसांनी हल्ला केला. यावेळी पोलीस अधिकारी देवेंद्र मिश्रा यांच्यासह आठ पोलीस शहीद झाले. यानंतर पोलिसांनी कारवाई करत विकास दुबे आणि त्याचे पाच साथीदार यांचा एन्काऊंटर केला.