UP Police Reply To Elon Musk: सरकारी यंत्रणा, मंत्री आणि अधिकारी यांच्याकडून ट्विटर हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म प्रभावीपणे हाताळला जातो. सामान्य व्यक्तीनं ट्विटरवर केलेली तक्रार प्रभावीपणे सोडवली जाते. त्यामुळे ट्विटरवर (Twitter) संबंधित यंत्रणेला टॅग करून प्रश्न विचारले जातात. भारतात तर ट्विटर या माध्यमाचा सर्वाधिक प्रभावी वापर केला जात आहे. मोजक्या शब्दात तक्रारी येत असल्याने संबंधित यंत्रणाही प्रश्न सोडवण्यास तात्काळ पुढाकार घेते. मात्र गेल्या काही दिवसात ट्विटरचा मालकी हक्क एलोन मस्क यांच्याकडे आल्यापासून अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. सोशल मीडियावर एलोन मस्क हे नाव आता सर्वांनाच परिचयाचं झालं आहे. आता युपी पोलिसांनी त्यांच्या ट्वीटला दिलेला रिप्लाय चर्चेचा विषय ठरला आहे. हे ट्वीट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. 


एलोन मस्क यांनी काय ट्वीट केलं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एलोन मस्क यांनी ट्विटरवर एक ट्वीट केलं होतं. त्यात त्यांनी लिहिलं होतं की, 'जर मी एखादं ट्वीट केलं तर ते काम म्हणून ग्राह्य धरलं जाईल का?' या ट्वीटला युपी पोलिसांनी आपल्या अंदाजात उत्तर दिलं आहे. या ट्वीटने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. एलोन मस्क यांच्या ट्वीटला उत्तर देताना युपी पोलिसांनी म्हंटलं आहे की, 'जर युपी पोलीस तुमच्या समस्येचं समाधान शोधू शकले तर कामाच्या स्वरुपात गणलं जाईल.' यानंतर युपी पोलिसांनी हॅशटॅग वापरून ट्विटर सेवा यूपीपी लिहिलं आहे. त्याचबरोबर एलोन मस्क यांना टॅग केलं आहे.



बातमी वाचा- तुम्ही Wi-Fi Debit Card वापरता? ही काळजी घ्या अन्यथा पैसे गेलेच समजा


युपी पोलिसांच्या रिप्लायनंतर युजर्स आपल्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत. एका युजर्सने स्क्रिनशॉन शेअर करत लिहिलं आहे की, "बिनोद देख रहा है ना, युपी पोलीस आता आंतरराष्ट्रीय झाली आहे." असं असलं तरी युपी पोलिसांच्या या ट्वीटला एलोन मस्क यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.