नवी दिल्ली : बँकिंग सेक्टरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी येणारा महिना सुट्टींचा असणार आहे. बँक कर्मचारी सप्टेंबर महिन्यात 12 सुट्यांचा आनंद घेऊ शकतील. अशातच तुमच्या वेळापत्रकात बँकांचे काम असेल तर त्यांच्या सुट्यांचे वेळापत्रक माहित असू देत. म्हणजेच ऐनवेळी तुम्हाला अडचणींना सामोरे जावे लागणार नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सप्टेंबरमध्ये असतील 12 बँकेच्या सुट्या
भारतीय रिझर्व बँकेने जारी केलेल्या लिस्ट नुसार सप्टेंबरमध्ये एकूण 7 बँकेच्या सुट्या असतील. तसे तर सुट्या संपूर्ण भारतात एकसाऱख्या असतात. परंतु काही राज्यांमध्ये विशेष सुट्या असतात. त्याशिवाय सप्टेंबरमध्ये 6 साप्ताहिक सुट्या असतील. 


सुट्यांची यादी


  • 5 सप्टेंबर - रविवार

  • 8 सप्टेंबर - श्रीमंत शंकरदेवा तिथि (गुवाहाटी)

  • 9 सप्टेंबर - तीज हरितालिका (गंगटोक)

  • 10 सप्टेंबर - गणेश चतुर्थी/संवत्सरी (चतुर्थी पक्ष)/विनायक चतुर्थी/वरसिद्धि विनायक व्रत (अहमदाबाद, बेलापुर, बेंगलुरु, भुवनेश्वर, चेन्नई, हैदराबाद, मुंबई, नागपुर, पणजी)

  • 11 सप्टेंबर - महीन्याचा दूसरा शनिवार/गणेश चतुर्थी दूसरा दिवस (पणजी)

  • 12 सप्टेंबर - रविवार

  • 17 सप्टेंबर - कर्मा पूजा (रांची)

  • 19 सप्टेंबर - रविवार

  • 20 सप्टेंबर - इंद्रजात्रा (गंगटोक)

  • 21 सप्टेंबर - श्री नारायण गुरू समाधी दिवस (कोची, तिरुवंतपुरम)

  • 25 सप्टेंबर - महीन्याचा चौथा शनिवार

  • 26 सप्टेंबर-  रविवार


दरम्यान ऑनलाईन बँकिंगचे कामकाज प्रभावित होणार नाही. म्हणजेच ग्राहकांना डिजिटल बँकिंगमध्ये कोणतीही अडचण येणार नाही. ते नेहमीप्रमाणे फंड ट्रान्सफर करू शकतील.