लखनऊ : उन्नाव पीडितेला लखनऊमधून एअरलिफ्ट करुन दिल्लीत आणण्यात आले आहे. इथे सफदरजंग रुग्णालयात तिच्यावर उपचार होणार आहेत. आज संध्याकाळी ६ वाजता लखनऊच्या अमौसी एअरपोर्टवरून तिला एअरलिफ्ट करण्यात आले. यावेळी दिल्लीमध्ये देखील लखनऊप्रमाणे विमानतळापासून रुग्णालयापर्यंत ग्रीन कॉरिडोर करण्यात आला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उन्नाव पीडिता ही ९० टक्के भाजली असून तिची स्थिती फारच गंभीर आहे. पीडितेवर आता लखनऊचा सरकार रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पण तिच्या स्थितीत काही सुधारणा दिसत नाही. यानंतर डॉक्टरांनी तिला दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात पाठवण्याचा निर्णय घेतला. 


याआधी लखनऊमध्ये रुग्णवाहीकेतून पीडितेला अमौसी एअरपोर्टपर्यंत आणण्यात आले. इथेही ग्रीन कॉरिडोअर बनवण्यात आला होता. इथे शंभर पोलीस तैनात होते. 



कुलदीप सिंहला दिलासा 


उन्नाव बलात्कार आणि अपघात प्रकरणात आमदार कुलदीप सिंह सेंगर याला मोठा दिलासा मिळालाय. सीबीआयनं उन्नाव बलात्कार पीडितेच्या अपघात प्रकरणात आपल्या पहिल्या आरोपपत्रात भाजपाचा माजी आमदार कुलदीप सिंह सेंगर आणि त्याच्या इतर सहकाऱ्यांविरोधार शुक्रवारी हत्येचे आरोप हटवलेत. 


जुलै महिन्यात झालेल्या रस्ते अपघातात पीडितेच्या नातेवाईकांसहीत गाडी चालकाचा मृत्यू झाला होता. तर पीडिता आणि तिचे वकील गंभीररित्या जखमी झाले होते. या अपघातानंतर तिच्या काकामांनी कुलदीप सिंह सेंगर याच्यासहीत काही लोकांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. 


ट्रक चालक आशिष कुमार पाल याच्यावर निष्काळजीपणाचा गुन्हा ठेवत व्यक्तीच्या मृत्यूचं कारणं बनणं, एखाद्याचा जीव धोक्यात टाकून त्याला गंभीर इजा पोहचवणं, निष्काळजीपणानं वाहन चालवणं या कलमांखाली आरोपी बनवण्यात आलंय. मात्र, सीबीआयच्या आरोपपत्रात आशिष कुमार पाल याच्याविरुद्ध कट रचण्याचा आरोप लावण्यात आलेला नाही.