उत्तर प्रदेशात धक्कादायक प्रकार, अॅपलच्या मॅनेजरची गोळी झाडून हत्या
उत्तर प्रदेशमध्ये कायदासुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय. गुंडाराज सुरु आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री योगी यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे...
लखनऊ : उत्तर प्रदेशमध्ये कायदासुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय. लखनऊच्या गोमती नगरमध्ये पोलीस कॉन्स्टेबलने अॅपलच्या मॅनेजरची गोळी झाडून हत्या केली. मॅनजेरने गाडी न थांबवल्यानं त्याच्यावर या पोलिसाला संशय आला. आणि त्यामुळेच त्यानं मॅनेजरवर गोळी झाडली. दरम्यान, काँग्रेस आणि समाजवादी पार्टीने मुख्यमंत्री योगी यांच्यावर जोरदार टीका केलेय. भाजप मुख्यमंत्र्यांच्या काळात कायदा सुव्यवस्था बिघडलेय. गुंडाराज सुरु आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री योगी यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी केली.
कामावरुन परत येत असताना दोन पोलिसांनी त्याला गाडी थांबवायला सांगितली. मात्र, त्यांनी गाडी थांबवली नाही. यानंतर पोलिसांनी त्याच्या गाडीवर गोळीबार केला. या गोळीबारात विवेक तिवारीच्या डोक्यात एक गोळी लागली. आणि त्यात त्याचा मृत्यू झाला.
शुक्रवारी मध्यरात्री लखनऊ शहरात हा प्रकार घडला. या प्रकरणी गोळी चालवणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. स्वतःच्या बचावासाठी आपण गोळी चालवल्याचे आरोपी कॉन्स्टेबलचे म्हणणे आहे. गंभीर जखमी झालेल्या तिवारी यांचा रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला.
उत्तर प्रदेश पोलिसांतील कॉन्स्टेबर प्रशांत चौधरी याने तिवारी यांच्या कारवर गोळी झाडली यात त्यांचा मृत्यू झाला. लखनऊमध्ये आयफोनच्या लॉन्चिग कार्यक्रमानंतर मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास तिवारी घरी परतत होते. दरम्यान, रस्त्यात त्यांना पोलिसांनी कार थांबवण्याचा इशारा केला. मात्र, तिवारी यांनी कार थांबवली नाही त्यामुळे कॉन्स्टेबर चौधरी यांनी त्यांच्यावर कारवर गोळी झाडली. यात तिवारी यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, याप्रकरणी कॉन्स्टेबल चौधरीवर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र, तिवारी यांनी आपल्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला त्यामुळे आपण स्वतःच्या बचावासाठी त्यांच्यावर गोळी झाडल्याचे आरोपी कॉन्स्टेबल चौधरीने म्हटले आहे.