मुंबई : जर तुम्हाला आयपीओच्या माध्यमातून शेअर बाजारात गुंतवणूक करायची असेल तर, या महिन्यात चांगल्या संधी उपलब्ध आहेत. या महिन्यात 10 आयपीओ येण्याची शक्यता आहे. या सगळ्या आयपीओच्या माध्यमातून 18 हजार कोटी रुपये उभारण्याची कंपन्यांची तयारी आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जुलै महिन्यात झोमॅटोचा सर्वात मोठा आयपीओ येणार आहे. तसेच या महिन्याचा सर्वात पहिला आयपीओ इंफ्रास्ट्रक्चर कंपनी जी आर इंफ्राप्रोजेक्ट्स लिमिटेडचा असणार आहे. 


झोमॅटोचा सर्वात मोठा आयपीओ
या महिन्यात झोमॅटोच्या आयपीओची साईज सर्वात मोठी असणार आहे. झोमॅटो 8250 कोटी रुपयांचा आयपीओ आणणार आहे. झोमॅटो फुड डिलेव्हरी क्षेत्रातील मोठी कंपनी आहे.


यासोबतच जुलैमध्ये ग्लेनमार्क लाइप सायन्स IPO च्या माध्यमातून 1800 कोटी, क्लीन सायन्स 1500 कोटी, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक 1350 कोटी रुपये, कृष्णा डायग्नोस्टिक 1200 कोटी रुपये, श्रीराम प्रॉपर्टीज 800 कोटी रुपये, रोलेक्स रिंग्स 600 कोटी रुपये, तत्व चिंतन फार्मा 500 कोटी इत्यादी IPO बाजारात येणार आहेत.