New IPO: तुम्ही IPO द्वारे बंपर नफा कमावण्याचा विचार करत असाल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे.  तुमच्या बजेटनुसार तुमच्या बँक खात्यात पैसे राखून ठेवा, पुढच्या आठवड्यात आणखी एका कंपनीचा IPO बाजारात येत आहे. (Upcoming IPO) शेअर बाजारातील सुधारणांसह कमाईच्या संधीही निर्माण होत आहेत. गेल्या काही दिवसांत शेअर बाजारात विक्रमी घसरण झाल्यानंतर बाजारात येणारे अनेक आयपीओ रोखण्यात आले. आता पुन्हा एकदा अनेक कंपन्या IPO आणण्याच्या तयारीत आहेत.   पुढच्या आठवड्यात आणखी एका कंपनीचा IPO विक्रीसाठी उपलब्ध होत आहे.


कोणत्या कंपनीचा आहे हा IPO?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

9 नोव्हेंबर रोजी  NBFC (Five Star Business Finance) कंपनीचा IPO ओपन होत आहे. कंपनी पब्लिक इश्यूद्वारे 1,960 कोटी रुपये उभारणार आहे. एकंदर गुंतवणूकदारांसाठीची बोली 7 नोव्हेंबरला सुरु होईल. किरकोळ गुंतवणूकदार 9 ते 11 नोव्हेंबर या कालावधीत IPO मध्ये गुंतवणूक करु शकतील. या IPO मध्ये शेअर्सची ऑफर फॉर सेल (OFS) केली जाईल. OFSमध्ये विद्यमान भागधारक आणि प्रवर्तक गट आपली हिस्सेदारी विकतील.


IPO मध्ये किमान किती गुंतवणूक करायची?


कंपनीने IPO ची किंमत 450 ते 474 रुपये प्रति शेअर निश्चित केली आहे. किरकोळ गुंतवणूकदारांना IPO मध्ये किमान एक लॉटसाठी बोली लावावी लागते. एका लॉटमध्ये 31 शेअर्स असतील. कोणताही किरकोळ गुंतवणूकदार जास्तीत जास्त 13 लॉटसाठी बोली लावू शकतो. तुम्ही किमान 14694 रुपये आणि कमाल 191022 रुपये गुंतवू शकता. IPO 21 नोव्हेंबरला लिस्टेड होईल आणि शेअर वाटप 16 नोव्हेंबरला होईल.


काय करते कंपनी, तुम्हाला माहित आहे का?


फाइव्ह स्टार बिझनेस फायनान्स लघु उद्योजक आणि स्वयंरोजगार असलेल्या व्यक्तींना सुरक्षित व्यवसाय कर्ज देते. चेन्नईस्थित कंपनीची दक्षिण भारतात चांगली पकड आहे. जून 2022 पर्यंत कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये आंध्र प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा आणि कर्नाटकचा वाटा 85 टक्के आहे. कंपनीच्या 8 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात 311 शाखा आहेत.


(Disclaimer: कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. ZEE 24 TAAS तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही.)