नवी दिल्ली : उत्तराखंडमध्ये बांध फुटल्याने अनेक जण वाहून गेले आहे. त्यापैकी 10 मृतदेह ताब्यात घेण्यात यश मिळालं आहे. तर अद्याप 150 कामगार बेपत्ता आहे. बेपत्त असलेल्यांची संख्या जास्त असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. तर ITBPने अडकलेल्या 16 जणांना बाहेर काढलं असून याठिकाणी अद्यापही रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. दरम्यान या प्रकल्पावर जवळपास 120 कामगार काम करत होते. त्यामुळे हे सर्व कामगार वाहून गेले असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाण्याचा प्रवाह अधिक असल्यामुळे आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शिवाय कर्णप्रयागमध्ये अलकनंदा नदी किनाऱ्यावरील घरे रिकामी करण्यात आली आहेत. ग्लेशियर तुटल्यामुळे ऋषीगंगा तपोवन हायड्रो प्रोजेक्टचा बांध फुटला आणि नदीतील पाण्याची पातळी वाढल्याची माहिती केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह यांनी दिली आहे. 



गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की एनडीआरएफची चार पथके (सुमारे 200 जवान) हवाईमार्गे डेहरादून पोहोचत आहेत तेथून ते जोशीमठला जातील. त्याचप्रमाणे आयटीबीपी आणि राज्य आपत्ती दलाचे कर्मचारी अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी प्रभावित ठिकाणी पोहोचले आहेत.



अपर जिलाधिकारी टिहरी शिव चरण द्विवेदी यांनी माहिती दिली की, धौली नदीला पूराची सूचना मिळताच अलर्ट जारी करण्यात आला आहे. हरिद्वार जिल्हा प्रशासनाने येथे अलर्ट जारी केला आहे. ऋषिकेशमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. नदीतून बोटींग आणि राफ्टिंग बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.