UPI Payments : आर्थिक व्यवहार अधिक सोपे आणि सोयीचे करण्यासाठी आणि मुख्य म्हणजे गैरव्यवहार टाळण्यासाठी म्हणून भारतामध्ये आर्थिक देवाणघेवाणीचे अनेक नियम मागील काही मोठ्या प्रमाणात बदलले. सुरुवातीला किचकट वाटणारे आणि तंत्रज्ञानाकडे झुकणारे हे नियम आणि अटी आता मात्र देशभरात इतके स्थिरावले की दर दुसरी व्यक्ती Digital Payment ला प्राधान्य देताना दिसते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतातील या युपीआय प्रणालीचं जगभरातील मंडळींनाही कौतुक वाटतं. इतकं की, विविध देशांचेय राजदूत थेट भाजी मंडईंमध्ये जाऊनच हे युपीआय कसं काम करतं याची प्रत्यक्षिकं पाहतात. फोन पे, Gpay, Amazon Pay, Paytm अशा अनेक माध्यमांतून हा आर्थिक व्यवहार केला जातो. 


हल्ली हे युपीआयनं पेमेंट करण्याचं प्रमाण इतकं वाढलं आहे, की मिरची कोथिंबीर असो, टॅक्सीचा प्रवास असो किंवा मग लहानातलं लहान काम असो, लगेचच क्यूआर कोड स्कॅन करून पैसे दिले जातात. एका क्षणात ते खात्यावर जमाही होतात. 'क्यूआर कोड द्या ना...' असं म्हणत अनेकजण मोबाईल स्कॅनकोडपुढं धरून तो स्कॅन करून एका मिनिटात पैसे देतात. पण, तुम्हाला माहितीये का दर दिवशी युपीआय पेमेंट करण्यासाठीही काही मर्यादा आहेत. त्यामुळं जरा दमानं घ्या! 


विविध माध्यमातून पैशांचा व्यवहार करण्यासाठी विविध मर्यादा 


NPCI च्या सूचनांनुसार UPI च्या माध्यमातून दिवसभरात निर्धारित रक्कमच दिली किंवा स्वीकारली जाऊ शकते. तुम्ही कोणत्या बँकेतून किंवा कोणत्या माध्यमातून हा व्यवहार करत आहात ते महत्त्वाचं. 


Google Pay वापरणारी मंडळी एका दिवसात जास्तीत जास्त 10 ट्रांजॅक्शन करू शकतात. दिवसभरात तुम्ही या अॅपच्या माध्यमातून 1 लाख रुपयांचा व्यवहार करु शकता. 


हेसुद्धा पाहा : 5 लाख रुपयांना विकला जातो हा चविष्ट मासा... गळाला लागला की लखपती बनलात समजा


Phonepe च्या माध्यमातून तुम्ही युपीआय वापरत 1 लाख रुपयांची रक्कम इतरांना पाठवू शकता. या अॅपमधून तुम्हाला किमान 10 ते 20 वेळा व्यवहार करता येतात. जर तासाला किती वेळा व्यवहार करावा यावर इथं कोणतीही बंधनं नाहीत. 


Paytm वापरण्याला तुम्ही प्राधान्य देत असाल तर, तुम्ही दिवसभरात 1 लाख रुपये कोणालाही पाठवू शतता. इथं व्यवहार किती वेळा करायचा आहे यावर कोणतंही बंधन नाही. तर, Amazon Pay सुद्धा वरील रकमेचा व्यवहार करण्याची मुभा तुम्हाला देतं. इथं मात्र तुम्ही दिवसभरात 20 वेळाच एखाद्या व्यक्तीला पैसे देऊ शकता. नवे युजर असाल, तर तुम्हाला दिवसभरात फक्त पाच वेळाच व्यवहार करता येतो. त्यामुळं ही मर्यादा कायम लक्षात ठेवा आणि मगच व्यवहार करा.