नवी दिल्ली : लोकसभेत तिहेरी तलाक विधेयकावर चर्चा सुरु असताना समाजवादी पक्षाचे खासदार आझम खान यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याने लोकसभेत गदारोळ झाला. आझम खान यांनी आपल्या भाषणात लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर बसलेल्या भाजप खासदार रमा देवी यांच्यावर शेरोशायरी केल्यामुळे भाजप खासदारांनी आक्षेप घेतला. खान यांनी माफी मागावी अशी मागणी केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकसभेत, आझम खान यांनी भाजपचे नेत्या रमा देवी यांच्या विरोधात आपत्तीजनक भाषेचा उपयोग केल्यानंतर लोकसभेत एकच गोंधळ निर्माण झाला. सभापती ओम बिर्ला यांनी यावर आक्षेप नोंदवला. त्यांनी आझम खान यांना आपल्या मर्यादेत बोलले पाहिजे, असे बजावले. ही बोलण्याची पद्धत नाही. तसेच आझाम खान यांच्या वक्तव्यावर रामदेवींनीही निषेध नोंदवला आहे. 



...तर मी राजीनामा देतो !


त्यावेळी आझाम खान यांनी माझी भाषा असंवैधानिक असेल तर मी माझ्या लोकसभा सदस्यत्वातून राजीनामा द्यायला तयार आहे. दरम्यान, समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनी त्यांची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. आझम खान यांची भावना वाईट नाही. यावेळी आझम खान म्हणालेत, "राम देवी माझ्या बहिणीप्रमाणे आहेत. तर भाजपने आझम यांना या विधानाबद्दल माफी मागण्याची मागणी केली. कॅबिनेट मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आझम खान यांनी माफी मागितली पाहिजे, असे म्हणालेत.



संसदेत जोरदार गोंधळ


अध्यक्ष रामा देवी यांनी म्हटले की, मी तुमच्या लहान बहिणीप्रमाणे आहे. ही बोलण्याची पद्धत नाही. यावेळी आझम खान म्हणालेत आपण खूप गोड आहात. माझी प्रिय बहीण आहात. यावेळी भाजपचे अर्जुन मेघवाल यांनी आझम खान यांच्या भाषणाला तीव्र विरोध केला. त्यांनी आपले शब्द मागे घेतले पाहिजे. रविशंकर प्रसाद यांनी आझम खानच्या विधानाचाही विरोध केला. यानंतर सभागृहात जोरदार गोंधळ उडाला.