मुंबई : संघ लोक सेवा आयोगाने युपीएससी २०१९ चा निकाल जाहीर झाला आहे. प्रदीप सिंहने यूपीएससीच्या सिविल सेवा (मेन्स) परीक्षा २०१९ मध्ये टॉप केलं आहे. दुसऱ्या क्रमांकावर जतिन किशोर आणि तिसऱ्या क्रमांकावर प्रतिभा वर्मा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यूपीएससीच्या सिविल सर्विझ परीक्षेच्या मुलाखती २० जुलैला सुरू झाले होते. याचा निकाल मंगळवारी जाहीर झाला आहे. विद्यार्थी यूपीएससीच्या संकेतस्थळावर आपला निकाल पाहू शकतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. यामुळे एकदा मुलाखत राऊंड रद्द करण्यात आला होता. 



यूपीएसची प्रीलियम आणि मेन्स परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर तिसरा टप्पा असतो मुलाखतीचा. यंदा लॉकडाऊनमुळे हा तिसरा टप्पा पुढे ढकलण्यात आला होता. त्यानंतर मुलाखतीला येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना योग्य ती सुविधा देण्यात आली होती. यानंतर त्यांचा तिसरा टप्पा पार पडला. 


असा पाहा निकाल


– UPSC चा निकाल पाहण्यासाठी www.upsc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जा.


Civil Services Examination, 2019 या लिंकवर क्लिक करा.


या पीडीएफमध्ये तुमचे नाव आणि रजिस्ट्रेशन नंबर पाहा


पीडीएफ फाइल डाउनलोड करून प्रिंटही काढू शकता.


या परीक्षेत प्रदीप सिंह देशात पहिला आला आहे. तर महाराष्ट्रातून अभिषेक सराफ पहिला आला आहे. UPSC civil Service साठी झालेल्या या परीक्षेत देशभरातून ८२९ महत्त्वाकांक्षी युवक युवतींची निवड झाली आहे. UPSC 2019 चा निकाल www.upsc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.