नवी दिल्ली : लोकसेवा आयोगाने आपल्या पूर्वीच्या घोषणेनुसार, आज ५ जून रोजी सिविल सर्विसेस (आयएएस) आणि भारतीय वन सेवा यांच्या प्रथम परीक्षा म्हणजे प्रिलियम परीक्षेची घोषणा केली आहे. या परीक्षेंच वेळापत्रक जाहीर झालं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फॉरेस्ट आणि सिविल सर्विसेस प्रिलिम परिक्षा ४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. सिविल सर्विस मेन्स परिक्षा ८ जानेवारी २०२१ रोजी होणार आहे. फॉरेस्ट सर्विस मेन्स २८ फेब्रुवारी २०२१ रोजी होणार असल्याची माहिती आज देण्यात आली आहे. 



 लोकसेवा आयोगानं विद्यार्थ्यांचे परिक्षा केंद्र बदलून दिले नाहीत. सध्या युपीएससी करणारे विद्यार्थी आपापल्या गावी गेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना  परिक्षा देण्यासाठी पुन्हा परीक्षा केंद्र दिलेल्या ठिकाणी जावे लागणार आहे. अनेक विद्यार्थ्यांना नवी दिल्ली येथे परीक्षा केंद्र दिले आहे.




अशा असणार परीक्षा 


६ सप्टेंबर २०२० - एनडीए आणि एन परीक्षा (१) २०२०
४ ऑक्टोबर २०२० - सिविल सेवा (IAS) आणि भारतीय वन सेवा (IFS) प्राथमिक परीक्षा २०२०
१६ ऑक्टोबर - भारतीय आर्थिक सेवा (IES) आणि भारतीय सांख्यिकी सेवा (ISS) परीक्षा 
८ ऑगस्ट - जियो सायंटिस्ट (मुख्य) परीक्षा २०२० 
९ ऑगस्ट - इंजिनिअरिंग सेवा 
२२ ऑक्टोबर - संयुक्त चिकित्सा सेवा (CMS) परीक्षा २०२०
२० डिसेंबर - सेंट्रल आर्म्ड पुलिस बल (असिस्टेंट कमांडेंट )परीक्षा २०२०