UPSC CSE Result: केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला आहे. ही परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करता येणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील मराठी उमेदवारांनी आपला दबदबा कायम ठेवला आहे. एकूण निवड झालेल्या उमेदवारांपैकी जवळपास 8.6 टक्के महाराष्ट्रातून आहेत. राज्यातून समीर प्रकाश खोडे प्रथम, देशात त्यांनी 42 वा क्रमांक पटकाविला आहे. या निकालात  पहिल्या 100 उमेदवारांमधे महाराष्ट्रातील तीन उमेदवारांचा समावेश आहे. नेहा राजपूत यांनी 51वा तर अनिकेत हिरडे यांनी  81 वा क्रमांक पटकावला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ऑल इंडिया रॅंकींनुसार अर्चित डोंगरे यास 153रॅंक, अनिकेत हिरडे 91 रॅंक तर प्रियांका मोहीतेला 595 रॅंक मिळाली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने सिव्हिल सेवा परीक्षा 2023 चा अंतिम निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेत आदित्य श्रीवास्तवने टॉप केलंय अनिमेष प्रधान दुसऱ्या स्थानी दर दोनुरु अनन्या रेड्डी तिसऱ्या स्थानी आहे. पीके सिद्धार्थ रामकुमार चौथ्य स्थानी आणि रुहानी पाचव्या स्थानी आहे. दरम्यान यूपीएससी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना पंतप्रधान मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.



आयएएस, आयएफएस आणि आयपीएससहित 1143 रिक्त जागांसाठी 1016 उमेदवारांच्या नियुक्तीची शिफारस करण्यात आली आहे. यामध्ये 347 उमेदवार खुल्या गटातील आहेत. 115 उमेदवार ईडब्ल्यूएस, 303 उमेदवार ओबीसी, 165 एससी, 86 उमेदवार एससी प्रवर्गातील आहेत. 355 उमेदवारांचा निकाल प्रोव्हिजनल ठेवण्यात आला आहे.


परीक्षार्थींच्या गुणांची मार्कशिट 15 दिवसांनंतर जाहीर करण्यात येणार आहे. 9 एप्रिल 2024 पर्यंत यूपीएससी सिव्हिल सेवा परीक्षेच्या मुलाखती सुरु होत्या. 2 जानेवारीपासून मुलाखत फेरीला सुरुवात झाली होती. मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेले साधारण 2846 उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आले होते. 


यूपीएससी सिव्हिल सेवा परीक्षा 2023 अंतर्गत आयएएएस, आयपीएस सहित सर्व्हिसेसमध्ये 1143 पदांची भरती निघाली होती. यामध्ये आयएएसच्या 180 जागा, आयपीएसच्या 200 तर आयएफएसच्या 37  रिक्त जागा भरण्यात येत आहेत. 


संपूर्ण निकाल


समीर प्रकाश खोडे (४२) नेहा उद्धवसिंग राजपूत (५१) अनिकेत ज्ञानेश्वर हिर्डे (८१) विनय सुनील पाटील (१२२) विवेक विश्वनाथ सोनवणे (१२६) तेजस सुदीप सारडा (१२८) जान्हवी बाळासाहेब शेखर (१४५) आशिष अशोक पाटील (१४७) अर्चित पराग डोंगरे (१५३) तन्मयी सुहास देसाई (190) ऋषिकेश विजय ठाकरे (२२४) अभिषेक प्रमोद टाले (२४९) समर्थ अविनाश शिंदे (२५५) मनीषा धारवे (२५७) शामल कल्याणराव भगत (२५८) आशिष विद्याधर उन्हाळे (२६७) शारदा गजानन मद्येश्वर (२८५) निरंजन महेंद्रसिंह जाधवराव (२८७) समिक्षा म्हेत्रे (३०२) हर्षल भगवान घोगरे (३०८) वृषाली संतराम कांबळे (३१०) शुभम भगवान थिटे (३५९) अंकेत केशवराव जाधव (३९५) शुभम शरद बेहेरे (३९७) मंगेश पाराजी खिलारी (४१४) मयूर भारतसिंग गिरासे (४२२) अदिती संजय चौगुले (४३३) अनिकेत लक्ष्मीकांत कुलकर्णी (४३७) क्षितिज गुरभेले (४४१) अभिषेक डांगे (452) स्वाती मोहन राठोड (४९२) लोकेश मनोहर पाटील (४९६) सागर संजय भामरे (५२३) मानसी नानाभाऊ साकोरे (५३१) नेहा नंदकुमार पाटील (५३३) युगल कापसे (५३५) हर्षल राजेश महाजन (५३९) अपूर्व अमृत बालपांडे (५४६) शुभम सुरेश पवार (५६०) विक्रम जोशी (593)  प्रियंका मोहिते (595) अविष्कार डेरले (604) केतन अशोक इंगोले (६१०) राजश्री शांताराम देशमुख (६२२) संस्कार निलाक्ष गुप्ता (६२९) सुमित तावरे (655) सुरेश लीलाधरराव बोरकर (६५८) अभिषेक अभय ओझर्डे (६६९) नम्रता घोरपडे (675) जिज्ञासा सहारे (681) श्रृति कोकाटे (685)  अजय डोके(687) सूरज प्रभाकर निकम (706) श्वेता गाडे (711) अभिजित पखारे (720) कृणाल अहिरराव (732) हिमांशु टेभेंकर (738) सुमितकुमार धोत्रे (750) गौरी देवरे (759) प्रांजली खांडेकर (७६१) प्रितेश बाविस्कर (767) प्रशांत डांगळे (775) प्रतिक मंत्री (786) मयुरी माधवराव महल्ले (७९४) राहुल पाटील (804) सिध्दार्थ तागड (809) प्राजंली नवले (815) सिध्दार्थ बारवळ (823) ओमकार साबळे (844) प्रशांत सुरेश भोजने (८४९) प्रतिक बनसोडे (862) चिन्मय बनसोड (893) निखील चव्हाण (900) विश्वजीत होळकर (905) अक्षय लांबे (908) निलेश डाके (918) किशनकुमार जाधव (923) ऐश्वर्या दादाराव उके (९४३) स्नेहल वाघमारे (945) शुभम त्रंबकराव डोंगरदिवे (९६३) गौरव हितेश टेंभुर्णीकर (९६६) मयांक खरे (९६८) शिवानी वासेकर (९७१) श्रावण अमरसिंह देशमुख (९७६) श्रुती उत्तम श्रोते (९८१) सुशीलकुमार सुनील शिंदे (९८९) आदित्य अनिल बामणे (१०१५)