UPSC Without Coaching: एखाद्याची स्वप्न पूर्ण करण्याची तीव्र इच्छा असेल तर वाटेत येणार अडथळेही छोटे वाटू लागतात. परिस्थितीवर मात करुन केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळविलेल्यांची अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत. सौम्या शर्मा यांची कहाणी देखील अशीच प्रेरणादायी आहे. मेहनत, जिद्दीच्या जोरावर त्या भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी म्हणून रुजू झाल्या. विशेष म्हणजे कोणतेही कोचिंग न लावता,  त्यात परीक्षा देताना प्रकृती साथ देत नसताना त्यांनी ही कामगिरी केली आहे. तापाने अंग फणफणत असताना परीक्षेला बसण्याचे अतिरिक्त आव्हान होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सौम्या शर्माने दिल्लीतील नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी (NLU) मध्ये कायद्याचे शिक्षण घेतले आहे. येथे अभ्यास करत असतानाच  2017 मध्ये त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेची तयारी केली. वयाच्या २२ व्या वर्षी त्यांनी हा प्रवास सुरू केला.


प्रशिक्षणाविना तयारी


कोचिंगला पैसे नाहीत म्हणून अनेक तरुण यूपीएससीची तयारी करणे सोडून देतात. पण सौम्या शर्मा याला अपवाद ठरल्या. त्यांनी 
यूपीएससी तयारीसाठी कोणत्याही कोचिंग संस्थेत न जाण्याचा निर्णय घेतला. त्याऐवजी, त्यांनी परीक्षेची तयारी करण्यासाठी वेगवेगळ्या टेस्ट दिल्या. सेल्फ स्टडी करत तिने प्राथमिक परीक्षा उत्तीर्ण केली. 


मुख्य परीक्षेदरम्यान तापाशी लढा


मुख्य परीक्षेच्या एक आठवडा आधी सौम्या यांना खूप ताप आला होता. मात्र, त्या आपल्या निर्धारावर कायम राहिल्या. आजारी असूनही ती 102-103 अंश तापमानात परीक्षा दिली. सौम्या यांना दिवसातून दोन ते तीन वेळा सलाईन द्यावी लागायची.