UPSC Civil Service Final Result 2021 : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) घेतलेल्या नागरी सेवा परीक्षा 2021 चा अंतिम निकाल आज जाहीर झालाय. श्रुती शर्मा UPSC च्या प्रतिष्ठित नागरी सेवा परीक्षेत अव्वल ठरली आहे. दिल्लीत तिने आपले शिक्षण पूर्ण केले. ती इतिहासाची विद्यार्थिनी आहे. श्रुती शर्मा गेल्या दोन वर्षांपासून जामिया मिलिया इस्लामिया येथील रेसिडेन्शिअल कोचिंग अकादमी (RCA) मधून प्रशिक्षण घेत होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युपीएससीच्या प्रतिष्ठेच्या नागरी सेवा परीक्षेत यंदा पुन्हा मुलींनी बाजी मारली आहे. या परीक्षेत श्रुती शर्माने प्रथम क्रमांक पटकावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, श्रुती शर्मा सेंट स्टीफन्स कॉलेज आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची (जेएनयू) विद्यार्थिनी आहे. तिने जामिया मिलिया इस्लामिया येथील निवासी कोचिंग अकादमीमध्ये राहून यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेची तयारी केली.


UPSC परीक्षेत श्रुती शर्मा प्रथम, अंकिता अग्रवाल दुसरी तर गामिनी सिंगला तिसरी आली आहे. ऐश्वर्या वर्मा चौथ्या स्थानावर आहे. उत्कर्ष द्विवेदीला पाचवा क्रमांक मिळालाय. यक्ष चौधरी सहाव्या स्थानावर आहे.


कोण आहे श्रुती शर्मा?


श्रुती शर्मा ही मूळची उत्तर प्रदेशातील बिजनौरची आहे. UPSC द्वारे घेतलेल्या नागरी सेवा परीक्षेत तिने भारतात पहिलं स्थान मिळवलं आहे.


टॉप 10 विद्यार्थी


1.श्रुती शर्मा


2. अंकिता अग्रवाल


3.गामिनी सिंगला


4.ऐश्वर्या वर्मा


5.उत्कर्ष द्विवेदी


6.यक्ष चौधरी


7. सम्यक एस जैनी


8.इशिता राठी


9.प्रीतम कुमार


10.हरकिरत सिंग रंधवा