नवी दिल्ली : युपीएससी प्रीलिम परिक्षा ३१ मे रोजी होणार होत्या परंतु या सर्व परिक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. परीक्षेसंदर्भातील पुढील तारीख २० मे नंतर दिली जाणार आहे.  लॉकडाऊनमुळे इंडियन सिविल सर्विसेस आणि फॉरेन सर्विसच्या परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या स्पर्धा परीक्षेसाठी देशभरातून तब्बल १८ विद्यार्थांनी अर्ज भरला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातून सुमारे दीड लाख विद्यार्थ्यांनी युपीएससी परीक्षेसाठी अर्ज भरला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युपीएससीने परिक्षा पुढे का ढकलल्या:
- प्रत्येक राज्यात परिक्षेचे केंद्र असतात. तिथे कलेक्टर आणि पोलिस प्रशासन तयारी करण्यासंदर्भात अहवाल देते. म्हणजेच
राज्य सरकार परिक्षा घेण्यासंदर्भात एनओसी युपीएससीला पाठवते. परंतु लॉकडाऊनमुळे तयारी झाली नाही, म्हणून एनओसी पाठविली नाही. परिणामी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.


- लॉकडाऊनमुळे पदवीला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा अद्याप झाल्या नाहीत. त्यांचे निकाल येणे बाकी आहे. त्यामुळे युपीएससी परिक्षा पुढे ढकलल्या.


दरम्यान, आज पासून लॉकडाऊनचा तिसरा टप्पा आहे. कोरोना रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येत सतत वाढ होत असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.