कोची : कोरोना व्हायरसचं संक्रमण रोखण्यासाठी प्रवासावर लावलेल्या निर्बंधामुळे अनेक परदेशी नागरिक भारतात अडकले आहेत. अनेक जण पुन्हा आपल्या घरी जायची वाट बघत आहेत. पण केरळमध्ये मागच्या ५ महिन्यांपासून असलेल्या अमेरिकेच्या जॉनी पियर्स यांना पुन्हा अमेरिकेत परतायचं नाही. आपलं उरलेलं आयुष्य भारतातच घालवण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. जॉनी पियर्स यांचं वय ७४ वर्ष आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेत सध्या अनागोंदी माजली आहे. अमेरिकेतलं सरकार भारत सरकारप्रमाणे आपल्या नागरिकांची काळजी घेत नाही, त्यामुळे मला इकडेच राहायचं आहे, असं जॉनी पियर्स म्हणाले.



जॉनी पियर्स सध्या केरळच्या कोचीमध्ये राहत आहेत. त्यांनी हायकोर्टात टुरिस्ट व्हिजाला बिजनेस व्हिजामध्ये बदलण्यासाठी याचिका दाखल केली आहे. बिजनेस व्हिजा मिळाला तर पुढचे १८० दिवस मी भारतात राहू शकतो आणि इकडे ट्रॅव्हल कंपनी उघडू शकतो. माझ्या कुटुंबातील बाकीच्या लोकांनी पण इकडे यावं, अशी माझी इच्छा आहे. भारतात जे काही चाललं आहे, त्यावर मी खुश आहे. अमेरिकेतली लोकं कोरोनाबाबत बेपर्वा आहेत, अशी प्रतिक्रिया जॉनी पियर्स यांनी दिली.