नोकरी नाकारणाऱ्या अमेरिकी मालकाला भारतीयाकडून हिंदीत शिवागाळ; Whatsapp Chat व्हायरल
Abused By Jobseeker Whatsapp Chat: नोकरी न मिळाल्याने संताप व्यक्त करण्याचे वेगवेगळे मार्ग असले तरी सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला एक स्क्रीनशॉट प्रत्येक भारतीयाची मान शरमेनं खाली घालायला लावणारा आहे.
Abused By Jobseeker Whatsapp Chat: नोकरीसाठी केलेले अर्ज आणि मुलाखतीनंतर मिळालेला नकार या दोन्ही गोष्टींमधून आपल्यापैकी प्रत्येकजण कधी ना कधी गेला असेल. मात्र नोकरी नाकारल्याने थेट मालकाला शिवीगाळ करण्याचा प्रकार फारच क्वचित पाहायला मिळतो. मात्र मूळचा अमेरिकी नागरीक असलेल्या अँथनी (टोनी) कलोरला असाच एक कटू अनुभव आला असून त्याने नोकरी नाकारलेल्या भारतीय तरुणाकडून व्हॉट्सअपवर आलेल्या शिव्यांचा एक स्क्रीनशॉटच शेअर केला आहे.
कोणाबरोबर घडला हा प्रकार?
कॅटऑफ गेमींग या कंपनीचा संस्थापक आणि मालक असलेल्या टोनीला त्याच्या कंपनीमध्ये नोकरीसाठी अर्ज केलेल्या एका भारतीय तरुणाने शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला आहे. टोनीनेच या तरुणाने पाठवलेल्या मेसेजचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावरुन शेअर केले आहेत. या तरुणाने टोनीला शिव्या दिल्या आहेत. टोनी नुकताच सॅन फ्रॅन्सिस्कोमधून बंगळुरुमध्ये स्थायिक झाला आहे. मात्र त्याच्या कंपनीमध्ये नोकरीसाठी अर्ज केल्यानंतर नकार दिल्याने एका तरुणाने त्याला व्हॉट्सअपवरुन शिवीगाळ केला.
तरुणाने नेमका काय मेसेज केला?
तुझ्या आईने तुला जन्म दिल्याबद्दल माफी मागितली पाहिजे, असा मेसेज पाठवत या तरुणाने टोनीला अश्लील शब्दांमध्ये खोचक टोला मारला. मात्र या हिंदी अश्लील शब्दाचा अर्थ न कळल्याने टोनीने अगदी प्रमाणिकपणे तुला अजूनही या नोकरीमध्ये रस आहे का? असा प्रश्न विचारला असला समोरुन परत त्याला शिवीगाळ करण्यात आली. त्याने हा स्क्रीनशॉट शेअऱ करताना, "काहीवेळेस भारतामधील नोकरीसाठी इच्छूक उमेदवारांना नकार झेपत नाही," अशी कॅप्शन दिली आहे. तसेच या हिंदी शिवीचा नेमका अर्थ काय असंही टोनीने विचारलं आहे.
काहींनी दाखवली टोनीची चूक
या भारतीय तरुणाने पाठवलेले मेसेज वाचून अनेकांनी राग व्यक्त केला आहे. अनेकांनी या तरुणाला बोलण्याची शिस्त नाही असं म्हटलं आहे. मी या तरुणाच्या वतीने तुझी माफी मागतो, असं म्हणत एकाने भारतीय व्यक्तीकडून असं घडल्याबद्दल दिलगीरी व्यकर्त केली आहे. मात्र काही लोकांनी टोनीनेच आधी या मुलाला, "तुझ्या आईला कॉल करुन मी माफी मागू का?" असा मेसेज केल्याकडे लक्ष वेधलं आहे. कोणतीही सभ्य व्यक्ती अशाप्रकारे घरी आईला कॉल करुन माफी मागू का असं नोकरी मागणाऱ्या व्यक्तीला म्हणत नाही, असं काहींनी म्हटलं आहे. टोनीच्या या विधानावरुन त्याला तशास तसं उत्तर या तरुणाने दिल्याचंही काहींनी म्हटलं आहे.
सध्या हा स्क्रीनशॉट चर्चेचा विषय ठरतोय हे मात्र नक्की.