उत्तर प्रदेश : भारतात आपण विचारही करु शकत नाही अशा प्रकारचे गुन्हे घडल्याचे पाहिले असतील. मात्र भारतातील पोलीसही तितक्याच चतुराईने या गुन्ह्यांची उकल करतात. पण या दरम्यान पोलिसांच्या क्षमतेचे कौतुक करायला आपण विसरतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असेच एक प्रकरण उत्तर प्रदेशमधून समोर आलं आहे. हे प्रकरण ऐकल्यानंतर  तुम्हीही उत्तर प्रदेश पोलिसांचे (Uttar Pradesh Police) कौतुक करण्यापासून स्वत:ला रोखू शकणार नाही.  एका प्रकरणात एफबीआयलाही (FBI) अपयश आलं असताना आरोपीला उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. 


हे संपूर्ण प्रकरण रत्नेश भुतानी (Ratnesh Bhutani) नावाच्या व्यक्तीशी संबंधित आहे. तो मेरठमधील एका हॉटेलचा मालक असल्याचे सांगण्यात येत आहे.


काय आहे संपूर्ण प्रकरण?


अमेरिकेची (America) तपास संस्था असलेल्या एफबीआयच्या (FBI) निशाण्यावर असलेल्या त्नेश भुतानीला मेरठ स्पेशल टास्क फोर्सने संजय प्लेस येथील कॅनरा बँकेच्या कार्यालयाजवळून अटक केली. त्याच्यावर बलात्काराचा गंभीर आरोप आहे. त्याविरोधात रेड कॉर्नर नोटीसही जारी करण्यात आली होती. 


पटियाला न्यायालयात हजर केल्यानंतर रत्नेश भुतानीची तिहार तुरुंगात (Tihar Jail) रवानगी करण्यात आली आहे. भारत सरकारला पाठवलेल्या अहवालात रत्नेश भुतानीचे नाव टॉप 10 गुन्हेगारांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले होते.


पोलीस महासंचालकांनी (DGP)भुतानीला अटक करण्याची जबाबदारी मेरठ एसटीएफकडे सोपवली होती. चौकशीदरम्यान भुतानीने सांगितले की, तो कॅन्सर लॅबमध्ये काम करण्यासाठी अमेरिकेत गेला होता. तिथे काही वर्षे राहिल्यानंतर त्याने अमेरिकेतील (America) एका मुलीशी लग्न केले आणि नागरिकत्व मिळवण्यात यश मिळवले. 2006 मध्ये त्याच्यावर मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप लावण्यात आला. त्यानंतर तो 2007 मध्ये तो मुंबईत आला आणि आपल्या भावासोबत फिल्म इंडस्ट्रीत (Film Industry) काम करू लागला.


आपली ओळख लपवण्यासाठी भुतानी मुंबईहून मेरठला आला आणि येथे हॉटेल चालवू लागला. तपासादरम्यान भुतानी अनेक अधिकारी आणि राजकारण्यांच्या संपर्कात असल्याचे समोर आले. 
जमिनीवर बेकायदेशीर ताबा मिळवल्याच्या एका प्रकरणात त्याला पकडण्यातही आलं होतं. मात्र काही नेत्यांच्या दबावानंतर त्याची सुटका करण्यात आली.