नवी दिल्ली: ईव्हीएमच्या वाढत्या तक्रारीनंतर विरोधक आणि निवडणूक आयोग यांच्यात सोमवारी दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मतदान यंत्र आणि व्हीव्हीपॅट यंत्रांविषयी विरोधी पक्षांनी काही आक्षेप नोंदवले. या आक्षेपांची निवडणूक आयोगाने दखल घेतली. या बैठकीला मुख्य निवडणूक आयुक्त ओ पी रावत उपस्थित होते.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या बैठकीला सात राष्ट्रीय पक्ष आणि ५१ प्रादेशिक पक्ष उपस्थिती लावली.  यामध्ये बॅलेट पेपर, मतदार यादी, राजकीय पक्षांचे खर्च याबाबत चर्चा करण्यात आली. 


एनडीएचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेसहित १७ राजकीय पक्षांचा मतपत्रिकेद्वारे मतदानाला समर्थन आहे. यामध्ये काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, बसपा, जनता दल एस,  तेलुगू देसम पार्टी, सपा, माकपा, राजद, द्रमुक, भाकपा, वाईएसआर काँग्रेस, केरळ काँग्रेस यासारख्या पक्षांचा सहभाग आहे.