Free Railway Wifi : भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पुर्ण झाले आहेत आणि या काळात देशातील रेल्वे स्टेशनमध्ये काळाच्या ओघात अनेक बदल झाले आहेत. वेगवेगळ्या सुविधा प्रवाशांना मिळाव्यात म्हणून भारतीय रेल्वेकडून सतत प्रयत्न केले जातात. अशीच एक सुविधा जी भारतीय रेल्वेकडून दिली जाते ती म्हणजे, रेल्वे स्टेशनवर मोफत वायफाय. आज आम्ही तुम्हाला, रेल्वे स्टेशनवर मोफत वायफायचा लाभ कसा घ्यायचा याबद्दल सविस्त माहिती सांगणार आहोत. यामुळे तुम्ही रेल्वे स्टेशनवर विना खंडीत इंटरनेटचा वापर करु शकता. चला तर मग जाणून घेऊ...


रेल्वे स्टेशनवर, असा करा Google railwire free WiFi चा वापर...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


1.  सर्वात प्रथम तुमच्या स्मार्टफोनमध्ये वायफाय सेटिंग ओपन करा.
2. आता वायफाय नेटवर्कचा शोध घ्या.
3. यानंतर उपलब्ध असलेल्या रेलवायर नेटवर्कची निवड करा.
4. आता railwire.co.in हे वेबपेज तुमच्या स्मार्टफोनमध्ये ओपन करा.
5. आता तुम्हाला तुमचा 10 अंकी मोबाईल नंबर एंटर करावा लागेल.
6. या 10 अंकी मोबाईल नंबरवर ओटीपी दिला जाईल.
7. रेलवायर या नेटवर्कला कनेक्ट करण्यासाठी पासवर्डच्या स्वरूपात मिळालेल्या ओटीपीचा वापर करा.
8. ओटीपीचा वापर केल्यामुळे तुम्ही रेलवायर वायफायला कनेक्ट व्हाल आणि मोफत इंटरनेटचा फायदा घेता येईल.


रेल्वे स्टेशनवर सर्वांना या सुविधेचा फायदा मिळावा म्हणून आम्ही तुम्हाला रेलवायरला कनेक्ट व्हायची प्रक्रिया सांगितली आहे. अनेकदा असं अढळून आलं आहे की, रेल्वे स्टेशनवर मोबाईलचं नेटवर्क चांगल्या पद्धतीने काम करत नाही. अशा वेळी रेलवायर ही सेवा विना खंडित इंटरनेटचा लाभ घेता येईल.