Home Remedies to Protect Rice : आपण वर्षभरासाठी तांदूळ स्टोर (Rice Store) करुन ठेवत असतो. पण काही काळाने चुकून आपला ओला  हात लागतो किंवा तांदूळ भरताना काहीतरी राहून जातं आणि मग तांदळात किडे, अळ्या होण्यास सुरुवात होते. जर यावर वेळीच बंदोबस्त केला तर उत्तम. नाहीतर मग हळूहळू त्याचे प्रमाण वाढत जाते आणि मग तांदूळ साफ करणे कठीण होऊन जाते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एवढ्या महागड्या धान्याचे नुकसान होऊ नये म्हणून काही गृहीणी घरगुती उपाय (Home Remedies to Protect Rice) करुन बघतात. यामुळे काही किडे, अळ्या असतील तर निघून जातील आणि तांदूळ स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतात. अशाच एक जुगाड एका गृहिणीने केला आहे, ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. 


आतापर्यंत आपण बांगडीचा वापर फक्त हातात घालण्यासाठी केला असेल, पण या गृहीणीने चक्क बांगडीचा वापर तांदळासाठी केला आहे. तांदळात बांगडी टाकण्याचा मोठा फायदा आहे.ज्याचा विचार तुम्ही कधीच केला नसेल. तांदळात बांगडी टाकल्याने काय होते, ते तिने या व्हिडीओत दाखवले आहेत. नेमकं या व्हिडीओत बांगडीचा वापर कसाप्रकारे करण्यात आला आहे ते पाहूया.. 


या व्हिडीओमध्ये एका गृहिणींने एका भांड्यात तांदूळ घेऊन त्यात पाणी टाकले आहे. आणि हातातील एक बांगडी देखील टाकली आहे. त्यानंतर दुसरे भांडे घेऊन तांदळाचे भांडे हलवून घ्या...त्यानंतर बांगडी तांदळाच्या आत तळाशी जाईल. आणि तांदूळ वर येईल. आता हातावर हळूहळू थोडे तांदूळ आणि दुसऱ्या भांड्यात पाणी गाळून घ्या.. ही प्रक्रिया शेवटपर्यंत हळूहळू करत रहा. त्यानंतर शेवटी तांदूळ उरतील त्यात तुम्हाला दगड दिसतील. सर्व दगड भांड्याच्या तळाशी राहतात. 



अनेकदा स्टोर केलेल्या तांदळात दगड असे राहून जातात. म्हणूनच तांदूळ निवडावे लागतात. तरी एखादे दुसरा दगड तांदळात राहतो आणि मग भात खाताना तो तोंडात येतो. पण या पद्धतीने तांदळात एकही दगड राहणार नाही. शिवाय तांदळातील प्रत्येक दगड काढणे सोपं होईल. जिथे तांदूळ निवडून दगज काढायला वेळ जातो. तिथे या ट्रिकने काही वेळातच तांदळाती दगड काढता येतील.  या व्हिडीओमध्ये महिलेने सांगितल्यानुसार तांदूळ निवडण्याची ही ट्रिक खूप जुनी आहे. तुम्हीही ही ट्रिक वापरत होता का?