मुंबई : आपण बऱ्याचदा हॉटेलच्या खोल्यांमध्ये छुपा कॅमेरा असण्याच्या घटना ऐकल्या आहेत. अशा लपलेल्या कॅमेऱ्यामुळे लोकांना समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे लोकं हॉटेलमध्ये गेल्यावर त्यांच्या मनात हे सतत येत असतं की, या खोलीत कॉमेरा तर लावलेला नाही ना? परंतु आज आम्ही तुम्हाला अशा काही ट्रीक सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही तुमच्या खोलीत लपलेला कॅमेरा शोधू शकता आणि त्याच्यामध्ये कैद होण्यापासून स्वत:चे रक्षण करु शकता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हॉटेलमध्ये चेक इन  (Hotel Check In) करताच, तुमच्या खोलीतील  संपूर्ण गोष्ट निट तपासा आणि विचित्र गोष्टी शोधण्यास सुरुवात करा. जर तुम्हाला असे काही आढळले, तर त्याला काढून टाका. त्याचप्रमाणे, जर तुम्हाला एखादे विचित्र उपकरण दिसले, तर ते हॉटेल कर्मचारी किंवा व्यवस्थापकाला कॉल त्यांना ती वस्तू तिथून काढण्यासाठी सांगा.


तसे पाहाता हिडन कॅमेराचा (Hidden Camera In Hotel) आकार खूप लहान असतो, त्यामुळे ते सहज कुठेही लपवले जाऊ शकते. त्यांपैकी बहुतेक कॅमेरा लेन्स अगदी हलका प्रकाश परावर्तित करतात. म्हणून लक्षात ठेवा की, खोलीत लपलेला कॅमेरा देखील प्रकाश प्रतिबिंबित करेल.


त्यामुळे खोलीचे दिवे बंद करा आणि पूर्णपणे अंधार करा. मग मोबाईलच्या टॉर्चने संपूर्ण खोली बघा. जर कुठेतरी प्रतिबिंब असेल तर लगेच ती जागा तपासा. (How To Find Spy Camera)


जर तुम्हाला खोलीत काही विचित्र गोष्टी दिसल्या किंवा बाहेरच्या गोष्टी दिसल्या तर लगेच त्यांना टॉवेलने झाकून टाका. जर एखादे विचित्र उपकरण दिसत असेल तर, ते अनप्लग करा आणि झाकून ठेवा. तुम्हाला हवं असेल तर, आपण अशा गोष्टी शोधून त्याला कपाटात देखील लपवू शकता.



आजकाल तंत्रज्ञान खूप प्रगत झाले आहे. त्यामुळे मोबाईलच्या माध्यमातून अशी अनेक अॅप्स (Spy Camera Detector Mobile Apps) डाऊनलोड करता येतात, ज्याच्या मदतीने खोलीत छुपा कॅमेरा शोधता येणे शक्य होते.


बाजारात अशी अनेक स्पाय कॅमेरा उपकरणे (Spy Camera Devices) आहेत, ज्याच्या मदतीने खोलीत छुपे कॅमेरे मिळू शकतात. जर तुम्ही कामासाठी वारंवार हॉटेलमध्ये राहणार असाल, तर हे उपकरणं तुमच्यासोबत नक्की ठेवा.