Maharashtra Politics : शिवसेनेचे एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्यासह 40 आमदारांनी बंड करत वेगळा गट निर्माण करुन महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप केला. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे उद्धव ठाकरे(uddhav thackeray) यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. रातोरात महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. यानंतर राज्यात नवे शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आले आणि एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. राजकारणाचा हा महाराष्ट्र पॅटर्न हिमाचल मध्ये देखील पहायला मिळाला आहे. काँग्रेसचे सुखविंदर सिंग सुखू एकनाथ शिंदेंची आयडिया वापरुन मुख्यमंत्री बनले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुखविंदर सिंग सुखू हे हिमाचल प्रदेशचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. रविवारी त्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. काँग्रेस हायकमांडने सुखू यांच्या नावाला मंजुरी दिली आहे. नादौनचे आमदार असलेले सुखू हिमाचलच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत. मुकेश अग्निहोत्री यांचे नाव हिमाचलच्या उपमुख्यमंत्री पदासाठी निश्चित करण्यात आले आहे. 


हिमाचल विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर शुक्रवारी सुखू हे काँग्रेसच्या 18 आमदारांसह गायब झाले. मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. मात्र, शनिवारी आमदारांसोबत झालेल्या बैठकीनंतर सुखविंदरसिंग सुखू यांच्या नावाची मुख्यमंत्री घोषणा करण्यात आली. यामुळे यांच्याकडून दबाब तंत्राचा वापर केला गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. 


सुखविंदर सिंग सुखू यांची राजकीय कारकिर्द


हमीरपूर जिल्ह्यातील नादौन येथून सुखू हे सलग चार वेळा आमदार म्हणून निवडणून आले आहेत. सुखू यांनी कायद्याचे शिक्षण घेतले आहे. काँग्रेस विंग नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया (NSUI) मधून  त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. शिमला येथील हिमाचल प्रदेश विद्यापीठात कार्यकर्ता म्हणून काम करणाऱ्या सुखू यांनी NSUI राज्य युनिटचे नेतृत्व देखील केले. 


2008 मध्ये त्यांची प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाली.  2013 ते 2019 पर्यंत त्यांनी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून देखील काम पाहिले. एप्रिल 2022 हिमाचल प्रदेश काँग्रेस निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष आणि तिकीट वितरण समितीचे ते सदस्य होते.


महाराष्ट्राच्या राजकारणाची कॉपी थेट ब्रिटनमध्ये


महाराष्ट्राच्या राजकारणाची कॉपी थेट ब्रिटनमध्ये पहायला मिळाली होती. एकनाथ शिंदे यांच्यासारखे बंड ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन(PM Boris Johnson)यांच्या कंजर्वेटिव पक्षात झाले आहे. 4 केंद्रीय मंत्र्यासह 40 जणांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले. यामुळे बोरिस जॉन्सन यांचे सरकार कोसळले असून त्यांना आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.