गांधीनगर : भरूच येथे 'उत्कर्ष समारंभ' ( Utkarsh Samaroh ) आयोजित करण्यात आला होता. या सभारंभात सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यानाही आमंत्रित करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) या सभारंभात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुजरातच्या या उत्कर्ष सोहळ्यात मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल ( Bhupendra Patel ) उपस्थित होते. गुजरात सरकारने राज्यात चार प्रमुख योजना राबविल्या. त्याची 100 टक्के अंमलबजावणी केली. या योजनांमुळे गरीब गरजूंना आर्थिक मदत होणार आहे.


याच कार्यक्रमात सरकारी योजनांचा लाभ घेतलेले एक लाभार्थी अयुब पटेल यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) चर्चा करत होते. यावेळी अयुब पटेल ( Ayub Patel ) यांनी आपल्या मुलीचे स्वप्न काय आहे ते मोदी यांना सांगितले. हे स्वप्न ऐकून मोदी भावुक झाले.


अत्यंत गरिबीची परिस्थिती असणाऱ्या अयुब पटेल यांच्या मुलीला डॉक्टर व्हायचे आहे. यासाठी ते आतापासूनच पैशाची जमवाजमव करत आहेत. त्यांची परिस्थिती जाणून घेताच मोदी अतिशय भावुक झाले.


अयुब पटेल यांची मुलीसाठीची ही आंतरिक तळमळ पाहून पंतप्रधान मोदी यांनी तुमच्या मुलीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला काही मदत हवी असल्यास मला सांगा. मी तुमची नक्की मदत करेन असे आश्वासन पटेल यांना दिले.