आग्रा-लखनऊ महामार्गावर अपघात ७ विद्यार्थी ठार
....
लखनऊ: उत्तर प्रदेशातल्या आग्रा-लखनऊ एक्सप्रेस वेवर झालेल्या अपघातात ७ विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय. कनौजमध्ये हा अपघात झालाय... एका बसमधून विद्यार्थी हरिद्वारला सहलीसाठी जात होते.... बसमधलं डिझेल संपल्यानं काही विद्यार्थी दुसऱ्या बसमधून डिझेल काढून या बसमध्ये भरत होते. त्याचवेळी मागून भरधाव वेगात येणाऱ्या बसनं ९ विद्यार्थ्यांना चिरडलं... या अपघातात सहा जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला... तर एका विद्यार्थ्याचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. ज्या बसनं धडक दिली, तो बसचालक फरार आहे.