Husband Killed Wife UP Crime: उत्तर प्रदेशमधील अलीगढ येथे एक विचित्र घटना समोर आली आहे. पती-पत्नीमध्ये झालेल्या कौटुंबिक वादामधून पतीने रागाच्याभरात पत्नीची धारदार हत्याराने वार करुन हत्या केली. यानंतर पती घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ येऊन बसला. या हत्याकांडाची माहिती आजूबाजूच्या लोकांना समजल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. या ठिकाणी झालेल्या गर्दीमधील एका व्यक्तीने पोलिसांना फोन करुन घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला आणि तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणाचा तपास सुरु आहे.


फॉरेन्सिक टीमने ताब्यात घेतलं हत्यार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही घटना अलीगढमधील बरला पोलिस स्टेशनच्या हद्दीतील गाजीपूर गावामध्ये घडली. येथे राहणाऱ्या मोहितचं 8 वर्षांपूर्वी सपनाशी (26 वर्ष) लग्न झालं होतं. सपना आणि मोहितला 5 वर्षांचा एक मुलगा आहे. मोहितचं किराणा मालाचं दुकान असून याच माध्यमातून त्याच्या कुटुंबाचा उदर्निवाह चालायचा. सपनाची हत्या करण्याआधी तिचा आणि मोहितचा कोणत्यातरी कारणावरुन मोठा वाद जाला. त्यानंतर संतापलेल्या मोहितने धारदार शस्त्राने पत्नीची हत्या केली. घटनास्थळाची पोलिसांबरोबरच फॉरेन्सिक टीमने पहाणी केली असून धारदार हत्यारही फॉरेन्सिक टीमने जप्त केली आहे.


अर्धनग्नावस्थेत ती शिड्या उतरुन खाली आली अन्...


पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये आरोपी मोहितने आपल्या पत्नीवर संशय असल्याचं सांगितलं. होळीच्या आधी कोणाबरोबर तरी निघून गेली होती. तिला शोधण्याचा मी फार प्रयत्न केला मात्र ती सापडली नाही. त्यानंतर 24 तासांनी ती घरी परतली.  तू कुठे गेली होतीस असं तिला विचारलं असता तिने काहीही उत्तर दिलं आहे. यावरुनच आमचा वाद झाला, असं मोहितने सांगितलं. तसेच सपना दुसऱ्या मजल्यावरुन अर्धनग्नावस्थेत शिड्या उतरुन रुमच्या दिशेने आल्याचं पाहून माझ्या तळपायाची आग मस्तकात गेल्याचंही मोहितने पोलिसांना दिलेल्या कबुली जबाबात म्हटलं आहे.


..अन् तो घराबाहेर येऊन बसला


सपना घरात अशा अवस्थेत फिरत असल्यावर मोहितने आक्षेप घेतला. त्यावरुन दोघांमध्ये नंतर बराच वाद झाला. संतापलेल्या मोहितने तिथेच बाजूला पडलेल्या हत्याराने सपनाच्या डोक्यावर आधी वार केला. त्यानंतर त्याने तिच्या छातीवर अनेक वार केले. पत्नीवर प्राणघातक हल्ला केल्यानंतर मोहितने हातातील हत्यार रुममधील बाथरुममध्ये फेकून दिलं. रक्ताच्या थारोळ्यामध्ये सपनाचा मृतदेह पडलेला असतानाच मोहित घराबाहेर आला आणि घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ बसला. घरातून आलेला आरडाओरडीचा आवाज ऐकून शेजारी घराकडे धावत आले तेव्हा मोहित घराच्या गेटजवळ बसलेला दिसला. त्याच्या हाताला रक्त लागलेलं दिसलं. शेजाऱ्यांनी घरात डोकावून पाहिलं तेव्हा समोरचं दृष्य पाहून त्यांना धक्काच बसला.


पोलिसांनी काय सांगितलं?


क्षेत्र अधिकारी बरला सर्जना सिंह यांनी या प्रकरणासंदर्भात माहिती मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाल्याचं सांगितलं. पती आणि पत्नीमध्ये मागील काही दिवसांपासून वाद सुरु असल्याचं तपासात समोर आल्याचंही सिंह यांनी सांगितलं.