मुंबई : देशात होऊ घातलेल्या मणिपूर, उत्तराखंड, पंजाब आणि उत्तर प्रदेश या 5 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. निवडणुका म्हंटल्या की फोडाफाडीचं राजकारण आणि पक्षांतर हे ओघाने आलंच. सपाने आतापर्यंत भाजपच्या 3 मंत्री आणि काही आमदारांना पक्षप्रवेश दिला. मात्र, भाजपने समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा अखिलेश यादव यांच्या घरालाच सुरुंग लावला आहे. (uttar pradesh assembly election 2022 samajwadi party mulayam singh yadav daughter in law aparna yadav join bhartiya janta party)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायम सिंह यादव यांच्या लहान सूनबाई अपर्णा यादव यांनी दिल्लीतील भाजप मुख्यालयात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला. यावेळेस अपर्णा यादव यांनी मनोगत व्यक्त केलं. 


त्यांनी आपल्या मनोगतात सपा आणि कुटुंबाचा उल्लेख केला नाही. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मोर्य यांचे आभार मानले.


अपर्णा यादव काय म्हणाल्या?  


"माझ्यासाठी राष्ट्र सर्वातआधी आहे. तसेच राष्ट्रधर्म माझ्यासाठी महत्तवपूर्ण आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांशी प्रभावित आहे. स्वच्छ भारत मिशन, महिलांसाठीच्या योजना तसेच रोजगाराचा मुद्दा असो, मी भाजपच्या या योजनांमुळे मी प्रभावित झाले आहे. मला पक्षश्रेष्टींकडून जी जबाबदारी दिली जाईल, ती मी पूर्ण क्षमतेने पार पाडेन", असं अपर्णा यादव म्हणाल्या.  


यूपीमध्ये निवडणुका केव्हा?  


उत्तर प्रदेशमध्ये एकूण 403 विधानसभा मतदारसंघ आहेत. या 403 मतदारसंघांसाठी एकूण 7 टप्प्प्यांमध्ये मतदानप्रक्रिया पार पडणार आहे. यूपीत 10, 14,20, 23, 27 फेब्रुवारीला पहिल्या 5 टप्प्यातील मतदान पार पडेल. तर 3 आणि 7 मार्चला अनुक्रमे 6 व्या आणि 7 व्या टप्प्यासाठी उमदेवाराचं भवितव्य मतपेटीत बंद होईल. तर 10 मार्चला मतमोजणी होणार आहे.