नवी दिल्ली : कोरोनामुळे देशातील सर्वच राज्यांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. यातून बाहेर पडण्यासाठी सर्वच राज्य प्रयत्न करत आहेत. ग्रीन झोनमध्ये नोकरी व्यवसायांना परवानगी देण्यात आली आहे. सोशल डिस्टन्सींगचे नियम पाळून जीवनावश्यक वस्तू विक्रेत्यांना परवानगी देण्यात आल्या आहेत. दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काही महत्वाच्या सूचना राज्य मंत्री मंडळाला केल्या आहेत. खर्च वाचवण्यासाठी यावर्षी कोणते नवे वाहन खरेदी केले जाऊ नये असे स्पष्ट आदेशच त्यांनी दिले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गरज नसताना नव्या योजना, नवे काम सुरु करु नये असेही योगी आदित्यनाथ म्हणाले. नव्या तंत्रज्ञानामुळे अनेक पद रिक्त झाली आहेत. सरकार ही पद पूर्णपणे बंद करणार आहे. अधिक मिटींग या व्हिडीओ कॉन्फरन्सवर होतील. कोणताच अधिकारी बिझनेस क्लासने प्रवास करणार नाही. इकॉनॉमिक क्लासच्या प्रवाशांना सवलत दिली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केल. 


केंद्र सरकारच्या अनेक योजनांमध्ये राज्य सरकारांना आपला वाटा द्यावा लागतो. यापुढे एकरकमी पैसे न देता हफ्त्याने दिले जातील. कोणती नवी योजना आणण्यात येणार नाही. गरजेच्या नसलेल्या योजनांना स्थगिती देण्यात येणार आहे. जे काम सध्या सुरु असेल ते कमी खर्चात केले जाईल. कोणते नवे काम घेतले जाणार नाही असे योगींनी सांगितले. 



कोरोना संकटात अनेक कार्यालयांची कामाची पद्धत बदलली आहे. अनेक जागा रिक्त झाल्या आहेत. ही पदं बंद करावीत. त्याजागी असलेल्यांना इतर ठिकाणी सामावून घ्यावे. कोणती नवी भरती करु नये. सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या भत्त्यांमध्ये कपात होणार आहे.  स्टेशनरी खरेदीमध्ये २५ टक्के कपात तर विविध विभागांच्या प्रचार आणि प्रसार खर्चातील २५ टक्के खर्च कमी करा असे देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 


कोणती नवी गाडी खरेदी केली जाऊ नये. गरज पडल्यास भाड्याने गाडी घेतली जावी. जास्तीत जास्त मिटींग या व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे होतील. गरज भासल्यास इकॉनॉमिक क्लासने प्रवास करु शकता. तसेच या आर्थिक वर्षात कोणते सरकारी संमेलन किंवा वर्कशॉप हॉटेलमध्ये खर्च होणार नाही.