UP Crime: एका वर्षापर्यंत...! नवऱ्याने लग्नमंडपात घातली अजब अट; आपल्याच वडिलांच्या कनाखाली मारली अन्...
bride refuses to marry at last moment: सर्वकाही सुरळीत सुरु असतानाच अचानक नवरा मुलगा आणि त्याच्या आईने लग्न होणार नाही अशी भूमिका घेतली आणि सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला
bride refuses to marry at last moment: लग्नाच्या उत्साहादरम्यान अचानक वरपित्याने व्यक्तीने नवऱ्या मुलाच्या कानशिलात लगावली आणि त्यानंतर नवऱ्या मुलाने ठेवलेल्या अजब अटीमुळे लग्नमंडपात लग्न मोडलं व मुलगा मुलीशिवाय आल्या पावली परतला. नवऱ्या मुलाच्या या भूमिकेमुळे त्याचे वडीलसुद्धा गोंधळले. त्यांनी आपल्या मुलाला सर्वांसमोर मंडपातच कानाखाली लगावली. यानंतर मुलाने बापावर प्रतिहल्ला करत मारहाण केली. यानंतर अशी काही परिस्थिती निर्माण झाली की मुलाने लग्नालाच नकार दिला. हे प्रकरण थेट पोलीस स्थानकामध्ये पोहोचलं. दोन्ही पक्षांच्या लोकांची समजूत घालण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र त्यात यश आलं नाही.
हा सारा प्रकार घडला उत्तर प्रदेशमधील (uttar pradesh) चित्रकूटमध्ये. येथील शिवरामपुर परिसरामधील शिवनाथ पटेल यांच्या मुलीचं लग्न कानपुरमधील निवृत्त एअरफोर्स कर्माचाऱ्याचा मुलगा अमित कटियारबरोबर होणार होतं. लग्नाच्या दिवशी कार्यक्रमाच्या ठिकाणी पारंपारिक पद्धतीने मुलीकडच्यांनी वऱ्हाड्यांचं स्वागत केलं. जयमालेचा कार्यक्रमही पार पडला. मात्र यादरम्यान नवरा मुलगा वारंवार वधू पक्षाच्या रुममध्ये जाऊन तिच्याशी बोलत होता. मध्यरात्री चढावा म्हणजेच शगुन देण्याच्या कार्यक्रमानंतर अचानक मुलगा आणि त्याच्या आईने लग्न होणार नाही अशी आडमुठी भूमिका घेतली.
असा आरोप करण्यात आली की नवरा मुलगा मुलीला जाऊन सांगत होता की एक वर्ष तिची विदाई करणार नाही. म्हणजेच एक वर्ष या मुलीला आपण माहेरी पाठवणार नाही असं हा मुलगा सांगत होता. पुढील शिक्षण तुला चित्रकूटऐवजी कानपुरमधूनच करावं लागेल असं त्याने तिला सांगितलं. यावरुन लग्नमंडपामध्ये वाद झाला. अचानक आपल्या मुलाने घेतलेल्या या भूमिकेमुळे त्याचे वडील चांगलेच संतापले आणि त्यांनी सर्वांसमोर पोराच्या म्हणजेच नवरदेवाच्या कानशिलात लगावली. सर्वांसमोर वडिलांनी कानाखाली मारल्याने नवऱ्या मुलाला अपमानास्पद वागणूक दिल्यासारखं वाटलं आणि त्यानेही आपल्या वडिलांवर हात उचलला. हा सारा प्रकार पाहून मुलीने आणि तिच्या घरच्यांनी लग्न लावून देण्यास नकार दिला. लग्नाचे पुढील सर्व विधी थांबवण्यात आले.
मुलीने लग्नाला नकार दिल्यानंतर वरपक्षाने आधी ठरवल्याप्रमाणे मुलीकडील व्यक्तींने आमचं स्वागत आणि विवाहामधील विधी पार पाडल्या नाहीत असा आरोप केला. माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलीस स्थानकातील प्रमुख रजोल नागर लग्नमंडपामध्ये पोहचले. त्यांनी दोन्ही पक्षातील लोकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र याचा फारसा फायदा झाला नाही. प्रकरण मारहाणीपर्यंत गेल्यानंतर दोन्ही बाजूलाच्या लोकांना घेऊन पोलीस थेट पोलीस स्टेशनला पोहोचले. दोन्ही बाजूच्या लोकांनी आपआपला खर्च एकमेकांना परत करण्यावर सहमती दर्शवल्यानंतर समेट झाली आणि नवरा मुलगा वऱ्हाड्यांसहीत लग्न न करताच कानपूरला परतला.