पत्नी प्रियकराबरोबर S*x करत असताना रात्री अचानक पती घरी आला अन्...; मुलं आरडाओरड करत घराबाहेर पळाली
Husband Axes Wife Lover: हा सारा प्रकार घडला तेव्हा या दोघांची लहान मुलं बाजूच्या रुममध्ये होती. ही मुलं आरडाओरड करत घराबाहेर आली आणि त्यांनीच गावकऱ्यांना याबद्दल सांगितलं.
Husband Axes Wife Lover: उत्तर प्रदेशमधील एका गावात फारच धक्कादायक हत्याकांड घडल्याची माहिती समोर आली आहे. जौलन येथील टिकरी गावामध्ये एका व्यक्तीने पत्नी आणि तिच्या प्रियकराला रंगेहाथ पकडल्यानंतर कुऱ्हाडीने वार करुन दोघांचीही हत्या केली आहे. हा सारा प्रकार मंगळवारी रात्री उशीरा घडला असला तरी त्याचा खुलासा आता झाला आहे.
पत्नीच्या चारित्र्यावर संशय
मिळालेल्या माहितीनुसार, तिशीत असलेला आणि मजुरी करणारा कुंवर सिंह हा या प्रकरणातील आरोपी आहे. 32 वर्षीय पत्नी निकिता आणि दोन लहान मुलं असं कुंवरचं चौकोनी कुटुंब होतं. मात्र मागील काही महिन्यांपासून कुंवरला वारंवार आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संक्षय वाटत होता. आपल्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याची शंका कुंवरला होती. यावरुन मागील काही महिन्यांपासून अनेकदा पती-पत्नीमध्ये वाद व्हायचा. निकिताने कायमच पतीचे आरोप फेटाळून लावले. मात्र कुंवरने मंगळवारी रात्री आरतीला तिच्या प्रियकराबरोबर त्यांच्याच राहत्या घरात रंगेहाथ पकडलं.
कुऱ्हाडीने दोघांवर हल्ला...
पत्नी आणि तिच्या प्रियकराला घरातील बेडवर नग्नावस्थेत पाहिल्यानंतर संतापलेल्या कुंवरने तिथेच असलेल्या कुऱ्हाडीने दोघांवर हल्ला करुन त्यांना ठार केलं. निकिता आणि तिचा प्रियकर छविनाथ ठाकुर या दोघांचा जागीच मृत्यू झाला. छविनाथ ठाकुर हा 40 वर्षांचा होता. कुंवार मंगळवारी रात्री अचानक त्याच्या गावच्या घरी कोणतीही पूर्वकल्पना न देता दाखल झाला असता त्याने पत्नी आणि तिच्या प्रियकराला कुंवारने घरातील बेडवर एकमेकांसोबत शय्या करताना नको त्या आवस्थेत पाहिल्यानंतर त्याचं स्वत:वरील नियंत्रण सुटलं आणि त्याने हा हल्ला केल्याचं सांगितलं जात आहे. कुंवरने या दोघांना ठार केलं तेव्हा निकिता आणि कुंवरची मुलं शेजारच्या रुममध्येच होती.
घरगुती हिंसाचाराची तक्रार
मिळालेल्या माहितीनुसार, छविनाथ ठाकुर हा शेजारच्या गावात राहायचा. टिकरी गावातील त्याचे काही नातेवाईक होते. त्यामुळे तो वरचेवर या गावात यायचा. छविनाथ ठाकुर आणि निकिताची ओळख झाली. मंगळवारी हा सारा प्रकार घडण्याच्या दहा दिवस आधीच कुंवार आणि निकितामध्ये चारित्र्याच्या संशयावरुन मोठा वाद झाला होता. या वादानंतर निकिताने पतीविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी या प्रकरणामध्ये कुंवरची चौकशीही केली होती. मात्र आपल्याला अटक होईल या भितीने कुंवर पोलिसांना तपासात सहकार्य न करता पोलीस स्टेशनला जाण्याचं टाळायचा.
कुंवर घरी आला तेव्हा पत्नी ठेवत होती शरीरसंबंध
पत्नीने केलेल्या तक्रारीमुळे कायद्याच्या कचाट्यात सापडल्यानंतर अचानक मंगळवारी रात्री कुंवर घरी आला असता त्याची शंका खरी ठरवणारं दृष्य त्याला घरात शिरल्यानंतर दिसलं. पत्नी तिच्या प्रियकराबरोबर शरीरसंबंध ठेवत असतानाच कुंवर घरात आला आणि त्याने दोघांवरही कुऱ्हाडीने हल्ला केला.
मुलं ओरडत बाहेर आली
निकिता आणि कुंवर या दोघांना 10 आणि 8 वर्षांची दोन मुलं आहेत. आपल्या घरातील प्रकार या मुलांनीच आरडाओरड करत घराबाहेर पळत येऊन गावकऱ्यांना सांगितलं. पोलिसांना या प्रकरणाची माहिती गावकऱ्यांनी दिल्यानंतर फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी येथून पुरावे गोळा केले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. कुंवरने आपला गुन्हा कबुल केला असून तो स्वत: पोलिसांसमोर शरण आला आहे.