Jija Sali News : कोरोना (Corona) प्रादुर्भावामुळे देशात काही महिने लॉकडाऊन (Lock Down) लावण्यात आला होता. या काळात देशातील अनेक शहरात गुन्हेगारी घटनांमध्ये मोठी घट झाली होती. मात्र यानंतर लॉकडाऊन हटवल्यानंतर गेल्या वर्षभरात गुन्हेगारी घटनांमध्ये पुन्हा लक्षणीय वाढ झाली आहे. घरफोड्यांपासून सोनसाखळी चोरीपर्यंतच्या (Chain Snatching) घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. त्यामुळे पोलिसांसमोर गुन्हेगारांचं आव्हान उभं राहिलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशातच चोरट्यांच्या एका टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. सराईतपणे चोरी करणाऱ्या या टोळीत एक महिलेसह दोन पुरुषांचा समावेश आहे. या टोळीचे कारनामे ऐकून पोलिसही हैराण झाले आहेत. विशेष म्हणजे या टोळीतील महिला आणि एक पुरुष नात्याने जीजा आणि मेहुणी आहेत. जीजा-मेहुणे मिळून भरदिवसा चोरीचे कारनामे करत होते. या टोळीच्या कारनाम्यांचं CCTV फुटेजही पोलिसांच्या हाती लागलं आहे. 


उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) पोलिसांनी (Police) या टोळीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी मोहम्मद आसिफ असं आहे, तर त्याच्या मेहुणीचं नाव राधा असं आहे. मोहम्मद आसिफ आणि राधा चालत्या बाईकवरुन महिलांच्या गळ्याची सोनसाखळ्या आणि सोन्याच्या मंगळसूत्रं ओढायची. ज्या ठिकाणी चोरी करायची आहे त्या भागाची आधी ते रेकी करायचे. ज्या महिलेच्या गळ्यातून सोनसाखळी किंवा मंगळसूत्र चोरायचं आहे त्या महिलेवर नजर ठेवली जायची. त्यानंतर संधी साधून हात साफ करायचे.



आरोपी मोहम्मद आसिफ बाईक चालवायचा तर बाईकवर मागे बसलेली राधा चुटकीसरशी महिलांच्या गळ्यातील सोन्याची चैन उडवायची. या भागात चैनस्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ झाल्यानंतर पोलीस स्थानकात अनेक तक्रारी येऊ लागल्या. याची दखल घेत पोलिसांनी तपास सुरु केला. चोरी झालेल्या काही भागातील सीसीटीव्हीचं फुटेज पोलिसांनी तपासलं. यात एक बाईकवरुन एक पुरुष आणि महिला सोनसाखळी चोरी करत असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. 


हे ही वाचा : Corona Update : कोरोनाचा XXB व्हेरिएंट किती धोकादायक? काय आहेत लक्षण? वाचा तज्ज्ञांचं मत


त्यानंतर पोलिसांनी अनेक भागात सापळा रचला. यात एके ठिकाणी जीजा-मेहुणीची ही जोडी आली असता पोलिसांनी त्यांना अटक केली. या दोघांनी 10 ते 12 गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. चोरलेल्या सोनसाखळी आणि मंगळसूत्र विकण्याचीही त्यांची वेगळी पद्धत होती. कोणालाही संशय येऊ नये यासाठी ते एकाच ज्वेलरच्या दुकानात सोनं विकत नव्हते. शहरातील वेगवेगळ्या भागातील ज्वेलर्सच्या दुकानात जाऊन सोनं विकत होते. आपण अडचणीत असून पैशांची गरज असल्याचं सांगत ते सोन्याच्या बदल्यात पैसे घ्यायचे. 


पोलिसांनी या दोघांसह आणखी एकाला ताब्यात घेतलं असून या टोळीने आणखी अशा किती चोऱ्या केल्यात याचा पोलीस तपास करत आहे.